शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

सहायक आयुक्तांनी केली वसतिगृहाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:10 AM

तुमसर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथील मुलांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार होती.

ठळक मुद्देमुलांच्या तक्रारींची दखल : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथील मुलांना सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत सहायक आयुक्त आशा कावळे यांनी मंगळवारला वसतीगृहाला भेट दिली.विनोबा नगर येथील मागासवर्गीय मुलांचे हे शासकीय वसतिगृह गत वर्षात शिवाजी नगरातील, नगराध्यक्ष पडोळे यांच्या खासगी मालकीच्या रिकाम्या अंजना भवनात स्थानांतरीत करण्यात आले होते. या वसतिगृहाची पाहणी सहायक आयुक्त यांनी मार्फत मंगळवारला करण्यात आली. सन २०१४ पासून ते स्थानांतरीत करण्यात आलेल्या एक ते दिड वर्षाच्या कालावधीत शासकीय वसतिगृहात राहणाºया मुलांना मुलभुत सोय सुविधांपासून वंचित राहावे लागले. मुलांना योग्य आहार व नित्य लागणाºया बाबींची पूर्तता करण्यात गृहपाल एस.एम. आबोजवार हे टाळाटाळ करतात, असे मुलांनी सहाय्यक आयुक्तांना परस्पर सांगितले. २०१४ पासून जेवनाची सोय पाहिजे त्या पध्दतीने न करता व आरोग्यास उपयोगी बाबींची पुर्तता न करता गृहपाल मुलांना धमकावून परिस्थितीवर चुप राहण्यास लावत असल्याचे आरोप मुलांनी केले आहे. गृहपाल हिटलरशाहीने मुलांना वागवून मानसीक त्रास देत असल्याने मुलांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्त येणार असल्याचे लक्षात घेवून वसतीगृहाच्या स्वच्छतेला कर्मचारी लागले असल्याचे मुलांनी सांगितले हे विशेष.शासनाच्या आदेशाची व नियमावलींची येथे पायमल्ली करुन गृहपाल हे वसतीगृहात न राहता शहरात दुसºया ठिकाणी भाड्याची खोली करुन राहतात. वसतीगृहात कधीकाळी मुलांच्या आरोग्यास किंवा अपराधी वृत्त्तीने शहराची संवेदनशिलता लक्षात घेवून काही अनैतीक घडल्यास, जबाबदार कोण राहणार असा प्रश्न मुलांनी आयुक्तांकडे उपस्थित केला. थंडीच्या दिवसात आंघोळीकरिता गरम पाणी नसल्यामुळे दर आठ ते दहा दिवसांनी मुले आंघोळ करतात. पाणी गरम करण्याचे सोलार सिस्टम गेल्या तीन वर्षापासून निकामी असल्याचे मुलांनी सांगितले. वसतीगृहाच्या इमारतीमध्ये गृहपाल हे परिवारासह राहू शकतील अशी पर्यायी सुविधा नल्यामुळे गृहपालांनी वसतीगृहात जास्त काळ वेळ देण्याची सक्ती करण्यात आली आहे.सहाय्यक आयुक्त आशा कावळे यांनी मुलांच्या समक्ष कर्मचाºयांना तसेच गृहपालांना उद्भवलेल्या समस्येबाबत विचारणा केली तर उळवा उळवीची उत्तरे देवून प्रकरणाला दुसरी दिशा देण्याच्या प्रयत्नात कर्मचारी दिसून आले. वसतीगृहाकरीता धान्य साठा तसेच आहाराची पुरवठा करणारे पुरवठदार हे नागपूरहून एकदाही परस्पर न येता साहीत्य पुरवीत असल्याची तक्रारही मुलांमार्फत करण्यात आली. वरिष्ठांनी पुरवठदार तसेच वसतीगृहात होत असलेल्या साहीत्य खरेदीची योग्य चौकशी केली तर मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. आयुक्तांकडून दखल घेवून गृहपालांच्या विरुद्ध मुलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीचा खुलासा देण्याची सक्ती करण्यात आली आहे.शाकाहारी तथा मासांहारी तसेच दररोजच्या जेवणाची मांडणी करण्याकरीता मुलांसोबतच चर्चा केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रोजच्या जेवनाची सहानिशा करण्याकरिता आयुक्तांनी मुलांच्या डब्यातील अन्न खाऊ न खात्री केली. शासकीय नियमांचा आधार घेवून नित्य जेवनाचे पदार्थ, खेळासाठी येत असलेला निधी, मुलांना मिळणारा नसल्याची तक्रार आहे.मुलांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येच्या चौकशीचे आदेश काढून संबंधीत गृहपालावर कारवाई केली जाईल. मुलांच्या सोयसुविधांची तत्काळ पुर्तता केली जाणार व दर पंधरा दिवसांनी वसतीगृहाची पाहणी नेमलेल्या निरीक्षकांकडून केली जाईल.-आशा कावळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,भंडारा.