आशा सेविकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:52+5:30

आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणून राज्यातील विविध भागात आरोग्य सेवा देण्याचे काम आशा वर्कर करतात. कामानुसार तोडका मोबदला दिला जातो. मासिक मानधन मिळण्याची शास्वती नसताना राज्याची आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.

Asha Sevik's Dharna Movement | आशा सेविकांचे धरणे आंदोलन

आशा सेविकांचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देवरठी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग : विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : हक्काचे वेतन व इतर मागण्यांकरिता ३ सप्टेंबरपासून आशा वर्करचे काम बंद आंदोलन सुरु आहे. शासनस्तरावर योग्य दखल न घेतल्याने वरठी येथे दोन दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे आरडाओरड न करता मूक धरणे आंदोलने करून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी वरठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया सर्व उपकेंद्राच्या आशा गटप्रवर्तक व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला होता.
आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणून राज्यातील विविध भागात आरोग्य सेवा देण्याचे काम आशा वर्कर करतात. कामानुसार तोडका मोबदला दिला जातो. मासिक मानधन मिळण्याची शास्वती नसताना राज्याची आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.
आशा वर्कर म्हणून अनेक महिलांना १० वर्षाच्या वर झालेत. दरम्यान त्यांनी अनेकदा संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आपल्या तक्रारी मांडल्या. पण यावर तोडगा काढण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे त्रस्त आशा वर्कर संघटनेने तीन तारखेपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
आंदोलनाबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाल्याची आरोग्य मंत्री यांनी सांगितले. मात्र मागण्या संदर्भात धोरण निश्चित करण्यात हेतुपरस्पर दिरंगाई होत आहे. यामुळे १४ व १५ सप्टेंबरला वरठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
यानंतर मागण्याचे निवेदन प्राथमिक आरोग्य अधिकारी याना देण्यात आले. उपसरपंच सुमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश बर्वेकर, शरद वासनिक, रितेश वासनिक, सुदर्शन डोंगरे, अरुण वासनिक व भोवते यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन समर्थन दिले.
आंदोलनात गटप्रवर्तक सरिता जेठे, ज्योती बावणे आशा वर्कर रचना वासनिक, शारदा फुले, मंजू रामटेके, ममता बन्सोड, रेखा वासनिक. योगिता गणवीर, शालू रामटेके, सुजाता रामटेके, अनिता सरोदे,वनिता बोरकर, निर्मला पारधी, आशा रेहपाडे, मंजुषा बालपांडे, सुळका कडव, छाया पडोळे, सुकेशनी गजभिये, सीमा डोंगरे, कल्पना मते, शांत वंजारी, शशिकला गायधने, नीलिमा भोयर, प्रेमकला धुर्वे, पुस्तकला मेश्राम, सुलोचना लोहबरे, कल्पना सव्वालाखे, मंजुषा सव्वालाखे, मंगला चन्ने, सुरेख दमाहे, देवला दमाहे, सिन्धु बांते व वनिता भोवते उपस्थित होते.

Web Title: Asha Sevik's Dharna Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.