शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

स्पर्धेतूनच कलावंत जन्माला येतो

By admin | Updated: December 27, 2015 00:54 IST

ग्रामीण भागात उत्तम कलावंत आहेत. परंतु व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना लोकांसमोर कला साकार करणारी संधी उपलब्ध होत नाही.

पवनीत कार्यक्रम : वसंत एंचिलवार यांचे प्रतिपादनपवनी : ग्रामीण भागात उत्तम कलावंत आहेत. परंतु व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना लोकांसमोर कला साकार करणारी संधी उपलब्ध होत नाही. विदर्भ पवनी ग्रुपतर्फे आयोजित गायन स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गायक कलावंत शोधल्या जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. वसंत एंचिलवार यांनी केले.विदर्भ पवनी ग्रुपतर्फे संभाजी चुटे रंगमंदिराचे पटांगणावर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी लाखांदूरचे बंटी सहजवानी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे माजी सदस्य मोहन पंचभाई, नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. विजय ठवकर, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, डॉ. विक्रम राखडे, पंचायत समिती सदस्य बंडू ढेंगरे, पप्पु रेवतकर, राम भेंडारकर, अरविंद काकडे, अशोक पारधी, प्रशांत पिसे, माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, नगरसेवक नरेश बावनकर, राजेश तलमले, अनिल धकाते, ग्रुपचे अध्यक्ष जगदिश ईटानकर, सचिव अनिल लेंडे व सहस्त्रगण यावेळी उपस्थित होते. ३० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेवून सुगम गित दोन फेऱ्यात सादर केले. तुमसर येथील प्रिंस चंद्रकांत मेरूगवार प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला.आसगाव येथील बाल गायक पिकोसा विनोद मोहरकर हीने द्वितीय पारितोषिक पटकाविले.तृतीय पारितोषिक अक्षय गौतम राऊत भिवापूर व तुषार किसन मानकर शिवनी यांना विभागून देण्यात आले. अरविंद काकडे, तोमेश्वर पंचभाई, किशोर पंचभाई व डॉ. अनिल धकाते यांचे हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक विदर्भ पवनी ग्रृपचे उपाध्यक्ष विश्वपाल हजारे यांनी तर संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन भक्तराज गजभिये यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)