ग्रीन फ्रेंड्सतर्फे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:10+5:302021-09-24T04:41:10+5:30

यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव उपक्रम कोरोना नियमांचे पालनात राबविण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धा घेण्यात ...

Artificial Ganesha Immersion Pool and Nirmalya Collection by Green Friends | ग्रीन फ्रेंड्सतर्फे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन

ग्रीन फ्रेंड्सतर्फे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन

Next

यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव उपक्रम कोरोना नियमांचे पालनात राबविण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धा घेण्यात आली. ग्रीन फ्रेंड्सच्या कार्यालयात कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन कक्ष तयार करण्यात आला. या विसर्जन कुंडात लाखनी पोलीस स्टेशनच्या गणेश मूर्तीचे सातव्या दिवशी विसर्जन पोलीस निरीक्षक तसेच नायक पोलीस आणि कॉन्स्टेबल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे, युवराज मस्कर, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, दिलीप घरडे, माधव वणवे, गौरी उईके, गोपनीय विभागाचे उमेश शिवणकर, कमांडो पथकाचे प्रभारी सुरेश आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल राजू बडवाईक, इतर पोलीस कर्मचारी, महिला पोलीस आणि होमगार्ड उपस्थित होते. पोलीस निरीक्षक व इतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना ग्रीन फ्रेंड्सतर्फे वृक्षाचे रोपटे भेट देऊन ग्रीन फ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी पंकज भिवगडे, मयूर गायधने, आरिफ बेग, दिलीप भैसारे, मुकुल गभने, प्रा. अर्चना गायधने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विसर्जनाच्या दहाव्या दिवशी शिल्पा गायधने, खुशाग्र गभने, गायधने, दीपक सूनने, प्रशांत गभने व विद्यार्थ्यांनी घरी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम गणेश विसर्जन कुंडात करण्यात आले. गणेश मूर्तीची विसर्जित झालेली माती आणि निर्माल्यापासून लवकरच निर्माल्य खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रीन फ्रेंड्सच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. उपक्रमाला अंनिस तालुका शाखा लाखनी व नेफडो जिल्हा शाखा भंडारा, ओम आगलावे, आर्यन धरमसारे, कार्तिक सेलोकर, आर्यन देशमुख, निखिल देशमुख, सुहानी पाखमोडे, स्विटी लांजेवार, मोहन आगरे यांचे सहकार्य लाभले.

230921\img-20210922-wa0074.jpg

photo

Web Title: Artificial Ganesha Immersion Pool and Nirmalya Collection by Green Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.