शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक करण्यात अखेर शिरजगाव पोलिसांना बुधवारी यश आले. मुन्ना उर्फ स्वप्निल अजाबराव खरपे (३२, रा. अडुळा बाजार, दर्यापूर) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देजावयाची करामत : शिरजगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : नजीकच्या बोदड येथे एका घराच्या ग्रीलशी चिमुकलीला चिंधीने बांधून पलायन करणाऱ्या पित्याला व त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात शिरजगाव पोलिसांना अखेर यश आले. आरोपी हा सदर घरमालकाचा जावई असल्याची माहिती पुढे आली आहे.दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक करण्यात अखेर शिरजगाव पोलिसांना बुधवारी यश आले. मुन्ना उर्फ स्वप्निल अजाबराव खरपे (३२, रा. अडुळा बाजार, दर्यापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह मुलीच्या जन्मदात्रीलाही अटक करण्यात आली आहे.रमेश सोलव यांच्या शेजारी राहणारे सुभाष वानखडे यांना प्रथम ही चिमुकली निदर्शनास आली. यानंतर शिरजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीे. पोलिसांनी चिमुकलीला बेबी केअर सेंटर (अमरावती) ला रवानगी केली. घटनेचा छडा लावण्याकरिता कसून तपास सुरू केला. शिरजगाव पोलीस अखेर आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र, या घटनेतील गुंता अधिकच वाढला आहे. रमेश सोलव यांचा जावई मुन्नाचे पटत नसल्याने मुलगी शुभांगी ही बोदड (सुभानपूर) येथे माहेरी राहत असल्याची बाब उघड झाली. मुन्ना हा खुनशी व भांडखोर प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रथम पोलिसांच्या खबऱ्यांनी त्याचा माग काढला. मात्र, तो अमरावती जिल्ह्यातून तडीपार असल्याने हाती लागत नव्हता. अखेर पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी कसोशीने शोध घेतला व अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून गोपनीय माहितीच्या आधारे दोघांना अटक केली. पोलीस चौकशीत सदर त्याने गुन्हा कबूल केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक कांबळे व पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, नायक पोलीस कॉँस्टेबल सुनीता जांभेकर, काँस्टेबल प्रतापसिंह ओलीक्षेत्री यांनी गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी