शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राहणार आता शिकाऊ शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:37 IST

Bhandara : सर्वांत जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची होईल निवड

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, या योजनेची माहिती मिळाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी अर्ज करीत आहेत.

काही शाळांमध्ये आलेल्या अर्जाची छाननी करून सर्वांत जास्त शिक्षण घेतलेल्या पात्र उमेदवारांची निवडही केली, तर काही ठिकाणी केवळ सोपस्कार पार पाडून निवडी केल्या. परंतु, या निवडीवरून गावागावांत राजकारण होत असून एकाची निवड केली तर दुसरा नाराज यामुळे गटागटाने मुख्याध्यापकांवर निशाणा साधून तक्रारी केल्या जात असल्याचे चित्र इतर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी गावातील राजकीय गट मुख्याध्यापकांवर दबाव टाकून निवडीसाठी शिफारस करीत आहे. त्यामुळे निवड केली किंवा नाही केली तरी आरोपाचे धनी होण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. 

मात्र, जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा दूत योजनेंतर्गत अर्ज मागविण्यापासून निवडीपर्यंतची रचना जशी आहे, तशीच ट्रेनी शिक्षकांची निवड करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दिली. लवकरच शाळांमध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थिची निवड होणार आहे. 

स्वतंत्र निवड यादी भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल. पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे.

गावातील राजकारणाचा मुख्याध्यापकांना ताप निवड करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना दिल्यामुळे गावातील राजकारणाचा मुख्याध्यापकांना ताप येणार आहे.

निवडीचे अधिकार मुख्याध्यापकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून या जागा भरत आहेत.

काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्यात येणार आहे.

शिकाऊ शिक्षक नियुक्त होणारशिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा, विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचविण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त होईल.

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी नियमांचे पालन केले जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये एकूण ७५६ प्रशिक्षणार्थी नियुक्त होणार आहेत. ३७ प्रशिक्षणार्थी यापूर्वीच जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नियुक्त केले आहेत."- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :bhandara-acभंडारा