शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

रेती चोरी पकडण्यासाठी पोलीस पाटलांची नियुक्ती

By admin | Updated: December 30, 2016 01:57 IST

रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केल्या जाते. ही बाब सामान्य

महसूल विभागाचा अफलातून प्रकार : कमी मानधनात अधिक कामे पवनी : रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केल्या जाते. ही बाब सामान्य माणसापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. त्यावर आळा घालणे, वरिष्ठांना अवघड झाले आहे. अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गावातील कोतवाल व पोलीस पाटील यांना नियुक्त करून महसूल विभागाने अफलातून प्रकार सुरु केलेला आहे. क्षमतेपलिकडे काम देऊन मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर अन्याय केला जात आहे. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या रेतीघाटावरून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु असतो. रेतीघाटावरून अवैध वाहतूक करून रेतीचा व्यवसाय करून रेतीघाटासाठी गुंतवलेली रक्कम किमान दुप्पट करणे ही रेती कंत्राटदारांचे ध्येय असल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकारी व चेकपोष्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॅनज केल्याचे कंत्राटदार उघड उघड बोलत असतात. असे असताना ३००० रुपये मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल व पोलीस पाटलांना चेक पोस्टवर नियुक्त करून काय साध्य होणार आहे हे न समजणारे कोडे आहे. भोजापूर येथील चेकपोष्टवर तीन पाळीमध्ये नऊ जण कार्यरत आहेत. वन्यप्राण्यांची भीती असलेल्या शेळी, सोमनाळा, खातखेडा, सिरसाळा, कन्हाळगाव, ढोरप, चांदी, कोदुर्ली, भोजापूर व सावरला गावातील कोतवाल व पोलीस पाटील यांची नियुक्ती वाहनाची तपासणी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. मानधनावर काम करणारे पोलीस पाटील तज्ज्ञ नाहीत. त्यांना संरक्षण नाही. त्यांच्याकडे शस्त्र नाहीत. अशावेळी वन्यप्राणी व ट्रक चालक यांचेपासून त्यांच्या जीवाला धोका असताना कशी जबाबदारी देऊन मानसिक छळ केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी) ५० हजारांची वसुली ४रॉयल्टीशिवाय ट्रक घेवून जाताना एक ट्रक ड्रायव्हर पवनी येथील तपासणी नाक्यावर ५०० रु. टीप देत असतो. तरच त्याचा ट्रक तपासणी शिवाय बाहेर पडतो. दर दिवसाला नाक्यावर साधारणत: ५० हजार रुपये अवैधरित्या जमा होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर या व्यवसायातून बाहेर पडलेल्या कंत्राटदाराने दिली.