शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरात फेरीवाला धोरण राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 01:29 IST

फेरीवाला धोरणानुसार फुटपाथ दुकानदारांचे नियमन करा या व इतर ७ मागण्यांचे निवेदन भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके

भाकपची मागणी : शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : फेरीवाला धोरणानुसार फुटपाथ दुकानदारांचे नियमन करा या व इतर ७ मागण्यांचे निवेदन भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात दि़ ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी व एसडीओ यांना देण्यात आले़ निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी निवेदन स्विकारले़ निवेदनात आपल्या भंडारा शहराचा नियोजनपूर्ण विकास व्हावा, शहर सर्वांग सुंदर व्हावा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेहमीच मागणी व प्रयत्न राहिले आहेत़ नको त्या 'िकाणी अतिक्रमण, चुकिचे व्यवसाय व काम करणे हे अयोग्य असून त्या विरुध्द पोलीस प्रशासन, नगर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे़ परंतु पुष्ठटपाथ दुकानदारांचे पेष्ठरीवाला धोरणानुसार योग्य नियमन न करता त्यांना रोजगारा पासुन वंचित करणे त्यांचा व्यवसाय व जीवन उध्दवस्त करणे हे चुकीचे व गैरकायदेशीर आहे़ भंडारा नगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणा अंतर्गत शहर फेरीवाला समिती असतांना फेरीवाला समितीची सभा न घेता नियमन न करता फुटपाथ दुकानदारांना उध्दवस्त करण्याची जिल्हा प्रशासनाची नगर प्रशासनाची पुलिस प्रशासनाची कारवाई गैरकायदेशीर असून उच्च न्यायालयाने व सर्वोेच्च न्यायालयाची अवमानना आहे़ शहर फेरीवाला समितीची स्थापन करण्यासाठी भाकप नगरसेवक हिवराज उके यांनी सातत्याने पत्र व्यवहार केला. समिती स्थापन करावयास लावली. परंतु त्या समितीची अजून बैठक झाली नाही. प्रशासनाच्या या गैरकायदेशीर भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करीत आह आणि मागणी करीत आहे की शहर फेरीवाला समितीची त्वरीत सभा बोलविण्यात यावे, योग्य नियमन करण्यासाठी सुंदर फुटपाथ २००९ नुसार फुटपाथ दुकानदारांसाठी फुटपाथ धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व नोंदणीकृत व इतर गरजु फुटपाथ दुकानदार व फेरीवाल्यांना ओळखपत्र देवून त्यांची योग्य सोय करण्यात यावी, शहरात या पूर्वी ठरल्या प्रमाणे हॉकर्स झोन, फेरीवाला झोन, पार्किंग झोनची नियोजन पूर्व व्यवस्था करण्यात यावी, ज्या ठिकाणी फुटपाथ दुकानदारांना व्यवसाय चालु शकेल अशाच ठिकाणी त्यांच्यासाठी गाळे बांधुन देण्यात यावे, शहर फेरीवाला समती असतांना त्यांची सभा न बोलवता प्रशासनाने केलेल्या योग्य चौकशी करुन दोषींवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, फुटपाथ दुकानदार व फेरीवाल्यांचे नियोजनपूर्व नियम होत पर्यंत त्यांना योग्य ठिकाणी व्यवसाय कण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आहे. मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा भाकपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात भाकपचे हिवराज उके, राज्य कौंसिल सदस्य सदानंद इलमे, शहर सचिव गजानन पाचे, अमित क्षिरसागर, राजु कुरंजेकर व छबी पाचे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)