लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील तहसील कार्यालयासमोरील चंदूबाबा क्रीडांगण जागेच्या प्रकरणात न्यायालयाने एका शेतकरी व तलाठीच्या बाजूने निकाल दिला असल्याने त्या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.मोहाडी येथील चंदूबाबा क्रीडांगणावर मागील ५० वर्षापासून विद्यार्थी व खेळाडू क्रिकेट, पोलीस भरती सराव करीत आहेत. याच जागेवर एक कोटी रुपयांच्या क्रिडा संकुलाला मान्यता सुद्धा मिळाली होती. तसेच क्रीडा संकुलाच्या जागेचे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले होते. ही जागा झुडपी जंगलमध्ये येत असल्याने तसा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र एक शेतकरी (तलाठी) ने ही जागा आपल्या मालकीची असल्याच्या कारणावरून न्यायालयात दाद मागितली होती. शासनाच्या वतीने भक्कम पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने त्या शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिल्याने संपूर्ण शहरवासी चिंतेत आहेत. सदरप्रकरण उच्च न्यायालयात घेऊन जावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, विजय पारधी, खुशाल कोसरे, मनिषा गायधने, किशोर पातरे, पुरुषोत्तम पातरे, विनोद बाभरे, ज्ञानेंद्र आगाशे, अफरोज पठाण, रफीक सैय्यद, सुनिल गिरीपुंजे, सुरेंद्र वंजारी, प्रविण हेडावू, विजय गायधने, प्रमोद भानारकर, अशोक डेकाटे, नारायण निखारे, सुहास लांजेवार, सुनंदा बालपांडे, ग्यानीराम सेलोकर, प्रभाकर बारई, कांता पराते, मंजू भानारकर, हेमलता नंदनवार आदींचा समावेश होता.
'ते' प्रकरण न्यायालयात अपिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:07 IST
येथील तहसील कार्यालयासमोरील चंदूबाबा क्रीडांगण जागेच्या प्रकरणात न्यायालयाने एका शेतकरी व तलाठीच्या बाजूने निकाल दिला असल्याने त्या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
'ते' प्रकरण न्यायालयात अपिल करा
ठळक मुद्देमोहाडीतील क्रीडा संकुलप्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन