कटकवार विद्यालयाचा उपक्रम : वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती व कीटकांचे झाले दर्शनसाकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या सक्रीय सदस्य विद्यार्थ्यांची निसर्गभ्रमंती नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या भाग असलेल्या जुन्या नागझिरा अभयारण्यात करण्यात आली. विद्यार्थ्यामध्ये निसर्ग व वन्यजीवाविषयी आस्था वाहुन यांचे जैवविविधता, सहजीवन समजुन घेण्याकरिता नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या साकोली कार्यालयातर्फे निसर्गभ्रमंती आयोजित करण्यात आली.नागझिरा निसर्गभ्रमंतीचे नियोजन व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यानिमित्त बंद होणाऱ्या शेवटच्या दिवशी डी.एफ.ओ पी.बी. सावंत, सहायक वनसंरक्षक सदगीर व खंडाते, वनक्षेत्राधिकारी राऊत व गव्हारे वनरक्षक गोसावी, वाहनचालक कुंभारे तसेच नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.निसर्गभ्रमंतीमध्ये सहभागी सक्रीय सदस्य विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी, वनस्पती व किटक यांचे दर्शन घडले. यात अस्वल, सांबर, निलगाय, ३० रानगव्यांचा कळप, सहा रानकुत्रे, अनेक मोर, शेकडो चितळ, रानडुकरे, सर्पगरूड, श्रृंगी घुबड, भृंगराज, यासोबत अनेक पक्षी व फुलपाखरे यांचे दर्शन घडले यावेळी राऊंड आॅफिसर गोसावी व प्रा. अशोक गायधने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासोबतच पिटेझरी येथील पर्यटन संकुलात असलेल्या पर्यटन माहिती केंद्राला सुद्धा विद्यार्थ्यांनी भेट देवून विविध माहिती फलकांचे सचित्र मार्गदर्शन घेतले. निसर्गभ्रमंतीत युवराज बोखडे, शाविद पठाण, आदित्य शहारे, रितीक जोशी, ऋषीकेश कोचे, पारस राऊत, यश भजे, लोकेश भजे, अथर्व गायधने, पवन रामटेके, गायधने, कुणाल भैसारे, आर्यन टेंभुर्णे यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.नागझिरा निसर्गभ्रमंतीचे सुंदर आयोजन केल्याबद्दल डीएफओपीबी सावंत, एसीएफ सदगीर, रेंजर राऊत व गव्हारे यांचे आभार प्राचार्य प्रकाश मसके, हिवराज येरणे, व्ही.एम. देवगिरकर, बी.एस. लंजे, प्रा. के.पी. बिसेन, प्रा. संजय पारधी, नविना काशिवार, पुष्पा बोरकर, विनोद तिडके, सेवक कापगते, विठ्ठल सुखरे, डी.बी. उईके, बी.एन. मांदाडे, जागेश्वर तिडके, अनुराधा रणदिवे, शिक्षिका गेडाम, प्रा. मडकवार, प्रा. कटरे आदींनी मानले. (तालुका प्रतिनिधी )
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात निसर्गभ्रमंती
By admin | Updated: July 4, 2016 00:29 IST