शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

दुग्धोत्पादनासाठी पशुसंवर्धन विभागाने तयार केली ‘वैरण बाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:01 IST

पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जिल्हा परिषदच्या वतीने जनावरांना सकस हिरवा आहार मिळावा व त्या माध्यमातून दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्ह्यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बाग तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देहिरव्या चाऱ्याने दुधात वाढ : जनावरांच्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जिल्हा परिषदच्या वतीने जनावरांना सकस हिरवा आहार मिळावा व त्या माध्यमातून दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्ह्यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बाग तयार करण्यात आल्या आहेत. वैरण बागेत २२ विविध प्रकारच्या वैरण पिकाच्या जाती लावण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात २२ जातीच्या वैरणाची लागवड करण्यात आली असून ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होत आहे. रुचकर चाऱ्यामध्ये भरपूर उत्पादन मिळवून देण्याची क्षमता असते.हायब्रीड नेपियर गवत, गिनी गवत, अंजन गवत, पांढरी मुसळी, दशरथ गवत, शेवरी, स्टायलो, छाया, लसूण गवत व दिनानाथ गवत असे हिरव्या वैरणीचे प्रकार आहेत. हा चारा जनावरांना नियमित दिल्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते.भंडारा जिल्हयातील सद्यस्थिती बघता जिल्हयातील शेतकरी कमी पोषक तत्व असलेले तणीस पाळीव जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. त्यामुळे जनावरांना योग्य ती पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्याचा परिणाम जनावरांच्या प्रजनन व पैदास क्षमता, दूध उत्पादन, शरीर वाढ व प्रतिकार क्षमतेवर होतो. पयार्याने शेतकऱ्यांचा तोटा होतो. ही बाब लक्षात घेऊन पशु संवर्धन विभागाने आत्माच्या माध्यमातून १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बागा विकसित केल्या आहेत. यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सतीश राजू व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी पुढाकार घेतला आहे.हिरव्या वैरणासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात आली आहे. या बागेतून शेतकऱ्यांना वैरणीचे ठोंबे मोफत मिळणार आहेत. ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतात हिरवा उत्पादन करू शकतील. ज्याचा उपयोग करून दूध उत्पादनात वाढ करता येईल.हिरव्या चाऱ्यामुळे उत्पादनात दहा ते वीस टक्के निश्चित वाढ होते. ही सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने समजावून सांगितली जात आहे. ३२ दवाखान्यात अझोला हा जनावरांसाठीचा पूरक चारा लावण्यात येत आहे. अझोला ही शेवाळ प्रकारातील वनस्पती असून यामुळे दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांनी हिरवा चारा उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पशु विभागाच्या वैरण बागेला भेट देवून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.मातीचा वापर न करता कमी पाण्यावर हायड्रोपोनिक्स हिरवा तयार करण्याची पद्धत खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही ते शेतकरी सुद्धा घरी हा चारा तयार करू शकतात. एक किलो मक्यामध्ये ९ ते १२ किलो हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो. हा चार अतिशय पौष्टिक असून यामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होते.-डॉ. नितीन फुके, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी