शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थ धडकले पोलीस ठाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

शुभम कटरे, मदन शरणागत, आकाश पारधी, देवानंद शरणागत यांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी येरली येथील नंदू रहांगडाले याला अटक करण्यात आली. नंदू रहांगडाले याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करीत शनिवारी रात्री शेकडो नागरिक तुमसर पोलीस ठाण्यात जमा झाले. सुमारे तीन तास नागरिक पोलीस ठाण्यात जमा होते. त्यामुळे भंडारा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील येरली येथील तरुणाच्या खून प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक केल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री ग्रामस्थांनी तुमसर पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. पोलिसांनी ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर गावकरी माघारी फिरले. या प्रकारानंतर येरली गावात संतापाचे वातावरण असून, गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.येरली येथील दिलेश उर्फ मायकल वाघमारे या तरुणाचा धारदार शस्त्राने ६ ऑक्टोबरला  सकृतदर्शनी धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी केवळ अरविंद उर्फ पिंटू इस्तारू पारधी या एकच आरोपीला  पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचा आरोप समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरत तुमसर पोलिसांना घेराव घातला होता.  तसेच पोलीस ठाण्यात निदर्शने केली होती. दरम्यान, मृतकाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत काही व्यक्तींचे नाव आरोपी म्हणून  नमूद केले होते. मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला होता.  परिणामी तब्बल १२ दिवसांनंतर समाजबांधव व  संघटनेने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करून     पोलिसांनी या घटनेची पुन्हा चौकशी सुरू करण्याची मागणी केली. चौकशीअंति त्या हत्याकांडात  अरविंद पारधी व्यतिरिक्त आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शुभम कटरे, मदन शरणागत, आकाश पारधी, देवानंद शरणागत यांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी येरली येथील नंदू रहांगडाले याला अटक करण्यात आली. नंदू रहांगडाले याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करीत शनिवारी रात्री शेकडो नागरिक तुमसर पोलीस ठाण्यात जमा झाले. सुमारे तीन तास नागरिक पोलीस ठाण्यात जमा होते. त्यामुळे भंडारा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली होती. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर गावकरी माघारी फिरले. पोलिसांनी नंदू रहांगडाले याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी दिली. 

गावात संतप्त वातावरणनंदू रहांगडाले याच्या अटकेमुळे येरली गावात संतप्त वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गावात पोलूस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अटकेच्या निषेधार्थ गावातील कुणीही व्यक्ती कामावर गेला नाही. घरीच राहून त्यांनी कारवाईचा निषेध केला.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे