भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली की, थंड पेयासोबतच नारळपाण्यालाही मागणी वाढते. त्यामुळे आपोआपच नारळाचे भाव वाढतात. नारळपाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे आता एका नारळामागे १० रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे मागणीत वाढउन्हाळ्यात लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या कार्यक्रमांत हजेरी लावणाऱ्यांचा घसा कोरडा पडतो. परिणामी, अनेकजण थंड पेयाबरोबरच नारळपाणी घेण्यावर भर देतात. त्यामुळे नारळपाण्याच्या किमतीमध्ये वाढ होत असते.
पुरवठा कमी असल्याने दर वाढलेउन्हाळ्याची चाहूल लागताच नारळाचा पुरवठा आपोआपच कमी होत जातो. परिणामी, मागणी अधिक होऊन बाजारपेठेत त्याचे दरही वाढत जातात.
धार्मिक कार्याचा परिणामफेब्रुवारी महिना संपल्यानंतर उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात होते. यादरम्यान, धार्मिक कार्यक्रम आणि लग्न समारंभही मोठ्या संख्येने असतात. त्याचाही परिणाम या नारळावर होत असतो.
"उन्हाळ्याची चाहूल लागताच नाराळपाण्याला अधिक मागणी वाढते. परिणामी, नारळाचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे बाजारात नारळाच्या किमती वाढतात. आता एका नारळामागे १० रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात हे भाव आणखी वाढतील."- अनिल चरडे, नारळ विक्रेते