शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:19 IST

आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.

ठळक मुद्देभगवान सुखदेवे : लाखनीत रंगले कवी संमेलन, ब्रोकन मेन मल्टीपर्पजचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.ब्रोकन मेन मल्टीपर्पज सोसायटी लाखनीद्वारा आंबेडकरी साहित्य संमेलन, कवी संमेलन, निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारोह महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी सी.एम. बागडे, कवी वामन शेळमाके प्रा. प्रमोदकुमार अणेराव, प्रा. डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. डॉ. उमेश बंसोड, प्रा. प्रल्हाद सोनेवाने, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, नामदेव कानेकर आदी उपस्थित होते.ते म्हणाले, विज्ञानवादी बुद्धिस्ट संस्कृती आपोआप आमुलाग्र बदलांचे, वैचारिक सम्यक ज्ञान आहे. समाजशील मन परिवर्तनाचे साहित्य विशेष अंगाने परिचित असताना एक संवेदनशील शतकांची पार्श्वभूमी तिचे स्वरूप लेखनकार्य, घटनात्मक, आंदोलनात्मक वृत्तीचे असून दर्जा व अधिकार आंदोलनातून करीत होतो. साहित्याची निर्मिती क्रांतीच्या प्रक्रियेला गतीमान करणारी शक्ती आहे. कवितेत क्रांती होत नसली तरी ती विचाराचंी ठिणगी टाकीत आचाराला प्रवृत्त करते. आंबेडकरी कवी आपल्या कवितेला आपल्या लढण्याचे शस्त्र समजतो.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर मी, मरणाला भीणार नाही, असा बलस्थानी संदेश मुन्ना नंदागवळी यांनी दिला. संतापाला जर कर्तृत्व, विशाल सामाजिक जाणीव, संयम आणि कल्पकता यांची जोड तर, ही क्रांती घडवून आणू शकते. क्रांतीपुत्रांनो, पसाभर उजेडासाठी मोनाद कसे सी.एम. बागडे यांनी तर, कवी वामन शेळमाके भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तुझ्या चळवळीचे तुकडे झालेच नसते. ही कष्टाची आत्मनिष्ठा, सामाजिक बांधिलकी कोणीही नाकारू शकत नाही. बहुजनांची उद्वेगजनक परिस्थितीमुळे कवी स्वाभाविक अस्वस्थ आहे. अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. 'भीम के दिवानो तुम्हे भीमजी के राहो पर चलना होगा, चाहे काटे क्यू ना हो, तुफानों से लढना होगा' कवी आकाश भैसारे यांनी खंत मनाला निर्णायक पवित्रा घेते. मित्रा, तू याच भूमीतला, मीही याच भूमीतला मग तुझ्यात माझ्यात का हे अंतर, कुठवर चालायच निरंतर कविता सादर केली. यावेळी मनोज बारसागडे, शिवानी काटकर, डॉ. हटणागर, अ‍ॅड. प्रशांत गणवीर, निकेत हुमणे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो श्रोतगण प्रामुख्याने उपस्थित होते.कवी संमेलनाचे संचालन प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी तर, आभार प्रदर्शन सी.एम. बागडे यांनी केले.