शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विकास निधी खर्च करण्यात तीनही आमदार आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर्षभराचा संपूर्ण निधी खर्च केला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघात संपूर्ण चार कोटी रुपयांचा निधी गतवर्षात खर्च करून मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सार्वजनिक हिताची कामे आमदार निधीतून करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक आमदाराला चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. भंडारा जिल्ह्यातील तीनही आमदारांनी त्यांना मिळालेला चार कोटी रुपयांचा संपूर्ण निधी विकासकामांवर खर्च केला आहे.वैयक्तिक लाभाची कामे सोडून सर्व प्रकाराची सार्वजनिक हिताची कामे आमदार विकास निधीतून करता येतात. भंडारा जिल्ह्यात तीनही आमदारांनी रस्ते, समाजमंदिर, सभागृह, विंधन विहिरी, शाळांना संगणक आणि वाचनालयांना पुस्तके देण्यासाठी केला आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर्षभराचा संपूर्ण निधी खर्च केला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघात संपूर्ण चार कोटी रुपयांचा निधी गतवर्षात खर्च करून मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावला आहे.

सर्वाधिक खर्च   रस्ते बांधकामावरजिल्ह्यातील तीनही आमदारांनी सर्वाधिक विकासनिधी रस्ते बांधकामावर खर्च केला आहे. ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्यावर त्यांनी भर दिला.

समाजमंदिर सभागृहावर भरसार्वजनिक हितासाठी  जिल्ह्यातील तीनही आमदारांनी समाजमंदिर आणि गावांमध्ये सभागृह बांधकामासाठी निधी खर्च केला असून गावकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केली.

शाळांना संगणक, वाचनालयांना पुस्तकेआमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या विकासनिधीतून शाळांना संगणक आणि वाचनालयाला पुस्तके दिली आहेत. २० शाळांमध्ये विकासनिधीतील संगणक आहेत.

 चार कोटींपैकी खर्च किती

नाना पटोले : संपूर्ण  चार कोटी निधी खर्चसाकोलीचे आमदार नाना पटोले यांनी वर्षभरात चार कोटींचा संपूर्ण निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च केला आहे. 

नरेंद्र भोंडेकर : विकास निधी खर्चात अव्वलभंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर विकासनिधी खर्च करण्यात अव्वल ठरले आहेत. त्यांनी चार कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासावर खर्च केला.

राजू कारेमोरे : रस्ते, समाजमंदिराला निधीतुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी संपूर्ण चार कोटींचा निधी खर्च केला असून, त्यातील बहुतांश निधी रस्ते, समाजमंदिर, विंधन विहिरी यावर खर्च केला.

आमदार निधी आता पाच कोटीमतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना आतापर्यंत चार कोटी रुपये निधी दिला जात होता. मात्र, आता हा निधी पाच कोटी रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे मोठ्या प्रमाणात केली जातील.

सुनील मेंढे : कोविड साहित्य खरेदीसाठी निधीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे खासदार झाल्यानंतर २०१९-२० या आर्थिक वर्षात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे २०२०-२१, २०२१-२२ या दोन वर्षांत निधी गोठविण्यात आला. मात्र, त्यांनी आपल्याला मिळालेला बहुतांश विकासनिधी लोकहिताच्या कामावर खर्च केला. गतवर्षी भंडारा व गोंदिया जिल्ह्याला कोविड साहित्य खरेदीसाठी २५ कोटी रुपये खासदार विकास निधीतून दिले आहेत.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMLAआमदार