शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘श्रीराम जयराम जय जय राम’चा गजर

By admin | Updated: April 16, 2016 00:29 IST

रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म दिवस.

हजारो भाविकांची उपस्थिती : नृत्य, झांकी, प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध, रामनवमी उत्साहातअडयाळ : रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म दिवस. रामयण या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र, पती, बंधु, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष. प्रजापालक श्रीराम जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या जलोषात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष आकर्षण म्हणून रामजन्म झाँकी, गरबा नृत्य, रामगीत धुन आणि संगितमय श्रीराम प्रवचन इत्यादी सादरीकरण हजारोंच्या समुदायाने असलेल्या भाविकांसमोर सादर करण्यात आले.रामजन्मोत्सव गावांगावात होत असला तरी अडयाळ येथील प्रसिध्द हनुमंत मंदिरातील रामजन्मोत्सवाची एक वेगळीच ओळख आहे. हेच वेगळेपण पहायला यादिवशी शेकडों मैलावरून हजारों भाविक अडयाळ मध्ये तोबा गर्दी करतात. आलेल्या लहान मोठया मंडळींना रामजन्मोत्सवानंतर वेध लागते ते म्हणजे विदर्भात प्रसिध्द असणाऱ्या घोडायात्रेची. सायंकाळ होताच मंदिराच्या चारही दिशा बाहेरुन आलेल्या मंडळीनी भरगच्च भरल्या दिसतात. या भाविकांच्या सुरक्षेसाठी येथील हनुमंत देवस्थान कमेटी, भागवत समिती, सर्वमित्र परिवार गावातील पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, समस्त लहान मोठे मंडळ, अतिथी देवो भव, पाळतात आणि याचमुळे आजपावेतो अनुचित प्रकार घडले नाही. यात्रा दिवसेंदिवस एवढी वाढत आहे की यावर्षी जागा अपुरी असल्यामुळे अंदाजे ३०० ज्योतीकलश पुढच्या वर्षाकरीता राखीव ठेवण्यात आले. ‘‘राम जन्मला गं. सखे राम जन्मला’’ या गिताने उपस्थित हजारों भाविक मंत्रमुग्ध झाले. रामजन्मानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रम घेण्यात आला. शांतता व सुव्यवस्थेसाठी ठाणेदार नेवारे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त ठेवण्यात आला. सोहळा उत्साहात आनंदात शांततेत पार पडला. सोहळयात आयोजित विविध कार्यक्रमांमुळे भाविकगण मंत्रमुग्ध झाले. शेवटी समितीने सहभागी भाविकांचे आभार मानले.(वार्ताहर)पालांदुरात रामनवमीचा उत्सव उत्साहातपालांदुर : चैत्र मास शुध्द नवमीच्या पर्वावर पालांदुरात नवरात्रीच्या प्रसंगाने श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्वक धार्मिक विधीवत मनोभावे पार पडला. कोलबास्वामी, केजाजी, हनुमान व कृष्ण मंदिरात भजन, कीर्तन व दिंडीच्या माध्यमातून रामकथेचे वर्णन करण्यात आले. भगवान राम व कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ कौटूंबिक, सामाजिक, नैतीक तसेच राजकीय मर्यादेत राहूनही पुरुष उत्तम कसा घडतो, हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे जीवन आपल्याला समजवीने, विचारात विकारात, दुखांत राम यांनी मानवी मर्यादा सोडली नाही. त्यामुळेच श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. गुडीपाडव्यापासून नवरात्रआरंभ होत असून रामनवमीला समाप्त होते. या नव दिवसात कोलबास्वामी मंदिरात भजन, कीर्तन व सायंकाळी दिंडीचे आयोजन पार पडले. यात तरुणांसोबत वृध्दांचा सहभाग उत्साहपूर्वक होता. उद्या शनिवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. शास्त्रशुध्द पध्दतीने पुजापाठ आटोपले. यात उमरेड येथील कीर्तनकार रामभाऊ सदावर्ती महाराज, मंदिराचे पुजारी (मठपती) चंद्रभान बोकडे आणि मंदिराचे विश्वस्तांनी सहभाग घेत कार्यक्रम उत्साहात पार पडला.(वार्ताहर) मोहाडीत श्रीराम जन्मोत्सवमोहाडी : चंदुबाबा देवस्थान मोहाडी येथे श्रीराम जन्मोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी देवस्थानाचे अध्यक्ष विश्वनाथ बारापात्रे, उपाध्यक्ष सुरेश सुखदेवे, सुखदेव आगाशे, जगदीश निखारे, बाबु पाटील, राजु बावणे, कल्याण बारापात्रे, देवा बारापात्रे, कविता बारापात्रे, उषा सुखदेवे, विणा निखारे, सुशिला बारापात्रे यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)