शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कृषी कर्मचारी शेतकऱ्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:27 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या विविध योजना : उपविभागीय कृषी अधिकारी सरसावले

मुखरु बागडे ।आॅनलाईन लोकमतपालांदूर चौ. : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र, नियोजनाअभावी शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागते. शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी आता थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी पुढाकार घेतला आहे.विविध योजनेत सुक्ष्म सिंचन, मागेल त्याला शेततळे, अनुदानावर कृषी अवजारे भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन, फळबाग लागवड, भातखाचरे दुरुस्ती, गांढूळ खत प्रकल्प आदी कल्याणकारी योजना राबविण्यात उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके व कृषी कर्मचारी पुढाकार घेतला आहे. पालांदूर परिसरात नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, पालांदूर येथील ५० च्या अधिक शेतकरी नव्या तंत्रात शेती कसायला सरसावले आहेत. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचन सुविधा नसल्यामुळे दुबार पिके घेण्यास मर्यादा येतात. शेततळे कोरडवाहू शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या सुक्ष्मसिंचन योजना व मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात येत आहे.शेतकºयांना भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजे मजुर व मजुरांचा वाढता खर्च यावर मात करण्याकरिता कृषी विभागामार्फत शेतकºयांना अनुदानावर ट्रॅक्टर व इतर कृषी उपयोगी अवजारे पुरविण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण कार्यकम राबविण्यात येत आहे.अपघातात मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांकरिता मदतीचा हाथ देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात आहे. मग्रारोहयो योजनेंतर्गत कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना नाडेप टाके, गांढुळ खत, निर्मिती टाके, फळबाग लागवड, भातखचारे दुरुस्ती आदी कल्याणकारी योजना राबविलया जात असून अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अंतर्गत शेतकरी सरसावला आहे.शेतकऱ्यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा गटागटाने शेती करावी. यामुळे शेती कसायला व मार्केटिंगला मोठी मदत होते. कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहे.- पी.पी. गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनीशेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत अनुदानावर कृषी साहित्य मिळत आहे. शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंतचे पीक व्यवस्थापन मार्गदर्शन आवश्यक आहे. सोबतच नवनवे पीक उत्पादाकरिता तंत्रशुध्द अभ्यास द्यावा.- उत्तम मेंढे, प्रगतशिल उच्चशिक्षीत शेतकरी, लोहाराकृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयापेक्षा शेतात अधिक वेळ द्यावा. वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यासपूर्ण नियोजन करीत शेतकऱ्यांना सहकार्य करावे.- घनश्याम भेदे, भेंडी उत्पादक शेतकरी, पालांदूर