शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आगीत 12 लाखांचे कृषी साहित्य भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:36 IST

दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : कृषी केंद्राला लागलेल्या आगीत १२ लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील दिघोरीमोठी येथे शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली उघडकीस आली. आगीत कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, रब्बी हंगामाचे धान बियाणे जळून खाक झाले. एका ट्रकचालकाला कृषी केंद्रातून पहाटे धूर निघत असल्याचे दिसल्याने आगीचा हा प्रकार पुढे आला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. बंद दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले. तोपर्यंत गावकरीही गोळा झाले.  कृषी केंद्राचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला, तर ते गरम झालेले होते. परिस्थितीत नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने शटर उघडले. कृषी केंद्रातील औषधी, बी-बियाणे व कीटकनाशके जळत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य भस्मसात झाले होते. काउंटरवर असलेले संगणक, रोख रक्कम, आदी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मखरू कापसे यांनी दिघोरी पोलिस ठाण्यासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच तलाठी संजय मेश्राम यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार १२ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज- कापसे यांच्या शिवश्रद्धा कृषी केंद्राला शॉर्टसर्किटमुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असून तपास दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

टॅग्स :fireआग