शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

दाेन महिन्यानंतर जिल्ह्यात काेराेना मृत्युसंख्या निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्याला शुक्रवारी माेठा दिलासा मिळाला. तब्बल ...

ठळक मुद्दे२११ काेराेनामुक्त : ८४ व्यक्ती पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्याला शुक्रवारी माेठा दिलासा मिळाला. तब्बल दाेन महिन्यानंतर मृत्युसंख्या शून्यावर आली तर २११ व्यक्ती काेराेनामुक्त झाले. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी हाेत असून शुक्रवारी केवळ ८४ व्यक्ती बाधित आढळून आले.भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ३८ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात तर मृत्यूचे तांडव सुरू हाेते. गिराेला घाटावर अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत हाेती. सर्वाधिक मृत्यू जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत झालेत. दरराेज वाढते मृत्यू पाहून नागरिक भयभीत झाले हाेते. अशा परिस्थितीत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. त्यासाेबतच मृत्यूही कमी हाेऊ लागले. शुक्रवारी जिल्ह्यात कुठेही मृत्यूची नाेंद झाली नाही. शुक्रवारी १४२१ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात २०, माेहाडी ०३, तुमसर ०४, पवनी १३, लाखनी २१, साकाेली १७, लाखांदूर ०६ अशा ८४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८०० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी ५५ हजार ३६४ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १३९८ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढत असून शुक्रवारी ९५.७९ टक्के नाेंद घेण्यात आली. तर मृत्युदर १.८० टक्के नाेंदविण्यात आला.जिल्ह्यात १३९८ ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात ४८९, माेहाडी ८३, तुमसर १३३, पवनी १०६, लाखनी २१२, साकाेली २७०, लाखांदूर १०५ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत भंडारा तालुक्यात २३ हजार ३३६ व्यक्ती काेराेनामुक्त झाले असून माेहाडी ४०८३, तुमसर ६७३३, पवनी ५७२३, लाखनी ६११९, साकाेली ६६८९ आणि लाखांदूर तालुक्यात २६८१ रुग्ण आहेत.

दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात- भंडारा जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून आले हाेते. मात्र दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ८०० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून शहरी भागातील ३९४ तर ग्रामीण भागातील ३४ हजार ४०६ रुग्णांचा समावेश आहे.  भंडारा तालुक्यात मात्र उलट स्थिती असून भंडारा शहरात १४ हजार ९०१ काेराेना रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात ९०४ रुग्ण आढळून आलेत.शहरी भागात ४०४ तर ग्रामीणमध्ये ६३४ मृत्यू- भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे आतापर्यंत १०३८ बळी गेले आहेत. त्यात शहरी भागात ४०४ तर ग्रामीण भागात ६३४ व्यक्तींचा समावेश आहे. मृतांमध्ये पुरुषांची संख्या ७४८ असून २९० महिलांचा काेराेनाने बळी घेतला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या