शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

अखेर उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

By admin | Updated: January 7, 2015 22:48 IST

गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित

तुमसर : गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हे बांधकाम होणार आहे. केंद्र व राज्य शासन येथे संयुक्तरित्या उड्डाणपूल तयार करीत आहे. ४० कोटींचा हा पूल असून अनेक वर्षांपासून प्रस्तावित होता.तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावर तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपूलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वाहतुकीला येथे प्रचंड अडथडा निर्माण होत असल्याने मागील १५ वर्षापासून उड्डाणपुल प्रस्तावित होता. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरित्या उड्डाणपूल तयार करीत आहे. ६० टक्के राज्य शासन तर १५ कोटी रेल्वे विभागाने येथे निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने २५ कोटींची निविदा काढली. दोन्ही बाजूच्या अप्रोच रस्त्याचा त्यात समावेश असून रेल्वे ८० मीटरचे रेल्वे ट्रॅकवरील बांधकाम करणारे आहे. राज्य शसनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीचे या कामावर देखरेख व नियंत्रण आहे. वनविभागाची येथे रितसर परवानगी प्राप्त झाली.दोन्ही बाजूचा अप्रोच रस्ता ५००-५०० मीटरचा आहे. रेल्वेच्या बांधकामाची निविदा अजून निघाली नाही. या उड्डाणपूलाला किमान एक ते दीड वर्षे लागणार असल्याची माहिती आहे. या रेल्व ेक्रासींगवर २४ तासात ११० मालगाड्या तथा २० ते २२ प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात. २४ तासात सुमारे १३० ते १४० वेळा ही फाटक बंद होते. यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. वाहतुकीची प्रचंड कोंडी येथे निर्माण होऊन रुग्णांना त्रास सहन करावा, लागत आहे. अनेकदा वाहनाच्या फाटकाला धडक बसलेल्या असून रहदारी खोळंबल्याच्या घटना घडल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)