शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

अखेर नरभक्षक बिबट जेरबंद

By admin | Updated: January 1, 2017 00:57 IST

चिखलाबोडी येथे चार वर्षीय खुशी चराटे या बालिकेचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण गावात वनविभागाविरूद्ध संताप निर्माण झाला होता.

रेंगेपार कोठा येथील पिंजऱ्यात अडकला : बिबटला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लाखनी : चिखलाबोडी येथे चार वर्षीय खुशी चराटे या बालिकेचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण गावात वनविभागाविरूद्ध संताप निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी चराटे कुटुंबीयांना आर्थिक मदत करा व बिबट्याला जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी रेंगेपार (कोठा) येथे पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा बिबट रेंगेपार शनिवारच्या पहाटे अडकला. चिखलाबोडी येथे आजीसोबत शेतात गेलेल्या खुशी चराटे या बालिकेला या बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर वनकर्मचाऱ्याविरूद्ध ग्रामस्थांमध्ये संताप पसरला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यासाठी विरोध केल्यामुळे पोलिसांना बंदोबस्त लावावा लागला होता. त्यानंतर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले. नरभक्षक बिबट्यास जेरबंद करा, चराटे कुटुंबीयाला शासकीय मदत द्या, मृत मुलीच्या वडिलाला शासकीय नोकरीत सामावून घ्या आणि दोन वनरक्षकांना निलंबित करा, अशी मागणी केली. त्यानंतर शासनाकडून एक लाख रूपये रोख व सात लाख रूपयाचा धनादेश त्या कुटुंबीयांना देण्यात आला. त्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर दहाव्या दिवशी रेंगेपार (कोठा) परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट पहाटेच्या सुमारास अडकला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे वृत्त परिसरात धडकताच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यानंतर या बिबट्याला गडेगाव लाकूड आगारात नेण्यासाठी पोलीस ताफा बोलाविण्यात आला होता. पिंजऱ्यात अडकलेला बिबट हा तोच नरक्षभक आहे किंवा नाही हे मात्र कळलेले नाही. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहायक उपवनसंरक्षक मनोहर गोखले, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक चकाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)