शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक पाहणीकरिता प्रशासकीय चमू शेतशिवारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:24 IST

Bhandara : शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे व निम्न चुलबंद प्रकल्पातील पाणी चुलबंद नदीला सोडल्याने पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यात दोन दिवस पूरस्थिती होती. तिसऱ्या दिवशीसुद्धा काही शेतात पुराचे पाणी आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूद ठरण्याची शक्यता दाट आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार लाखनी यांचे आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची जमु चुलबंद खोऱ्यात थेट बांधावर निरीक्षण करीत आहे.

पालांदूर परिसरातील मन्हेगाव, वाकल, ढिवरखेडा, पाथरी, नरव्हा, लोहारा, खराशी, खुणारी, विहीरगाव पळसगाव, खोलमारा, तई गोंदी, पालांदूर आदी गावातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. गर्भावस्थेतील धान पुरात डुबल्याने व त्यावर गाळ बसल्याने धान पीक समस्येत आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी तपासणी करीत आहेत. किती हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले त्याचा अचूक अंदाज प्रशासनाच्या वतीने घेणे सुरू आहे. प्रभावित शेतकरीसुद्धा त्यांच्या सोबतीला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे. खरीप हंगामाचा संपूर्ण खर्च अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसांत हंगाम घरात येण्याची शाश्वती असताना निसर्ग कोपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीच सरकारने पीक कर्जाचे प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना पुरवलेली नाही. कर्ज काढून पुन्हा हंगाम कसला. मात्र निसर्गाच्या रुद्र अवताराने शेतकरी संकटात आला. शासनानेसुद्धा तत्परतेने शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचासुद्धा लाभ लाभार्थ्यांना मिळावा. अशी अपेक्षा प्रभावित शेतकऱ्यांनी केली आहे.

"माझे धान गर्भावस्थेत आहे. तिसऱ्या दिवशीसुद्धा पुराचे पाणी बांध्यात साचले आहे, दोन दिवस संपूर्ण धान पुराच्या पाण्याखाली होते. त्यावर पुराची गाळ सुद्धा बसली आहे. त्यामुळे पीक सडण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे. शासनाने व प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा शंभर टक्के परतावा द्यावा."- भगवान शेंडे, प्रभावित शेतकरी, महेगाव.

"शेतशिवारात नुकसानग्रस्त भागाचा सर्वे सुरू असून ३३ टक्क्यांच्या वर नुकसान दिसत आहे. प्रभावित शेतकरीसुद्धा सोबतीला आहेत. गुरुवारला मन्हेगाव येथे सर्वे सुरू आहे. दररोजची माहिती वरिष्ठ स्तरावर दिली जात आहे." - सुनील कासराळे, तलाठी, पालांदूर.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीbhandara-acभंडारा