शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

रेतीचा उपसा प्रकरणी ‘पोकलँड’वर कारवाई

By admin | Updated: April 30, 2015 00:42 IST

करडी पोलिसांनी खडकी व मुंढरी येथील रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. ते दोन्ही ट्रॅक्टर भाजप कार्यकर्त्यांचे होते.

आमदारांचा तासभर ठिय्या : मोहाडी तहसीलदार व पोलिसांची कारवाईकरडी (पालोरा) : करडी पोलिसांनी खडकी व मुंढरी येथील रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. ते दोन्ही ट्रॅक्टर भाजप कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे आमदार चरण वाघमारे यांनी करडी चौकीत दुपारी तास भर ठिय्या मांडून लिलाव झालेल्या घाटावर बेकायदेशिरपणे चालविल्या जाणाऱ्या जेसीबी व पोकलँड मशनीवरही कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मोहाडी तहसिलदार व पोलिसांनी कारवाई करित कान्हळगाव मुंढरी घाटावरून पोकलँड ताब्यात घेतली. ही कारवाई मंगळवारी, सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. सकाळी आ. चरण वाघमारे करडी येथे जलशिवार योजनेच्या शुभारंभासाठी आले होते. करडी पोलिसांनी मुंढरी व खडकी येथील भाजप कार्यकर्त्यांचे रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून करडी चौकीसमोर जमा केले. पोलिसांना ट्रॅक्टर सोडण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने सांगितले. मात्र ते ऐकले नाहीत. आ. वाघमारे यांना ही हकीकत माहित होताच ते मोहगाव वरून परत करडी चौकी येथे येवून तासभर ठिय्या मांडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशिरपणे रेती घाटात जेसीबी व पोकलँड कशी लावली जात आहे, त्यांचेवर तत्काळ कारवाई करा, असे सूचना दिल्या.आ. वाघमारे यांचे सूचनेनुसार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तहसिलदार धोटे यांचे मार्गदर्शनाखाली कान्हळगाव रेती घाटावरून पोकलँड जप्त केली. करडी पोलीस चौकीसमोर जमा करण्यात आली. कारवाई करतेवेळी मोहाडीवरून पोलिसांची चमू बोलविण्यात आली होती. कारवाईमुळे परिसरातील बेटाळा, ढिवरवाडा घाटावरील कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)