शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पालिका प्रशासनाची पूर्वसूचना न देता अतिक्रमणाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:28 IST

नागरिकांत संताप : तुमसर शहरातील कुंभारेनगरातील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर: प्रशासक राजवटीत नगरपालिकेने एकतर्फी कर्तव्य बजावण्याचा सपाटा चालविला की काय ? असे दिसू लागले आहे. दलित वस्तीतून वाहणाऱ्या मुख्य नालीतील गाळ उपसण्याचे काम पालिकेच्या अंगलट आले आहे. नालीतील गाळ उपसायचे सोडून आरोग्य निरीक्षकाने कुंभारेनगरात चक्क अतिक्रमण हटविण्याची अनधिकृत कारवाई केली. यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. ही कारवाई पालिकेने ३० एप्रिल रोजी केली. परिसरातील महिलावर्ग धावून जाताच सफाई कर्मचारी कामाच्या ठिकाणाहून पोबारा झाल्याची माहिती आहे. शहरातील दाट लोकवस्तीत केलेल्या त्या कारवाईमुळे कुंभारेनगरातील मुख्य मार्ग सध्या बंद झाले आहे. काँक्रीटचा मलबा गत ४ दिवसांपासून रस्त्यावर पडून आहे. नाली उपशांची सूचना असताना आरोग्य निरीक्षकाने अतिक्रमण हटविण्याची अनधिकृत कारवाई का केली? कोणी तशी सूचना केली? कुणाच्या दबावात येऊन अधिकाऱ्याने कर्तव्य बजावले? आरोग्य विभागाच्या अधिकार कक्षेत नगर रचनाकार विभागाचे कर्तव्य मोडतात काय? तसे असेल तर पालिकेने स्थानिकांना लेखी सूचना, अथवा पोंगा फिरवून स्थानिकांना अवगत का केले नाही? अशा अनेक प्रश्नांनी सध्या तोंड वर केले आहे. मात्र, या सर्व प्रकारांपासून आरोग्य अभियंता अनभिज्ञ दिसून आले आहेत.

आरोग्य निरीक्षकाची अरेरावीनाली उपसा करताना घराची तोडफोड केली गेली. त्यावेळी स्थानिकांनी आरोग्य निरीक्षकाला मज्जाव केला. मात्र, महिलांना शिवीगाळ करून सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनधिकृत कारवाई केली.

लेखी सूचना देणे बंधनकारककुठलेही अतिक्रमण हटविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणधारकांना शेवटची संधी म्हणून लेखी सूचना करावी लागते; परंतु येथे नगरपालिकेने तसे केलेले नाही. कर्तव्याच्या नावावर कायदा हातात घेणे चुकीचे असून येथे संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकाने कारवाई करावी, अन्यथा स्थानिकांच्या संतापला तडा गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिला आहे.

वादग्रस्त वक्तव्यपालिकेला अनधिकृत अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत. तसे करताना अतिक्रमणधारकांना लेखी अथवा मौखिक पूर्वसूचना देणे गरजेचे नाही. तसा कायदा नाही. आरोग्य निरीक्षकाने असे वादग्रस्त वक्तव्य केले असून हे प्रकरण अधिकाऱ्याच्या अंगलट येण्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य निरीक्षकाने केला अधिकाराचा गैरवापरपाणी शुद्धीकरण केंद्रातील बँक वॉटरची विल्हेवाट कुंभारेनगरातून पिपरा गावाच्या दिशेने धावणाऱ्या मोठ्या नाल्यातून केली जाते. त्या नाल्यात गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पालिकेने नाली उपसा करायला सुरुवात केली आहे; परंतु असलेले अतिक्रमण आरोग्य निरीक्षकाने पूर्वसूचना न देताच काढत अधिकाराचा गैरवापर केल्याचे येथील रहिवासी संदीप कटकवार यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणGovernmentसरकार