शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

समर्पित भावनेतूनच यशाची प्राप्ती

By admin | Updated: February 11, 2016 00:51 IST

विद्यार्थी स्वत:ला ग्राहक समजतात तर त्यांच्यावर संस्कार करणारे प्राध्यापक उपजिविकेचे साधन म्हणून कर्तव्य पार पाडतात.

कुलगुरु काणे यांचे प्रतिपादन : एस.एन. मोर महाविद्यालयाचा सुवर्ण जयंती समारोहतुमसर : विद्यार्थी स्वत:ला ग्राहक समजतात तर त्यांच्यावर संस्कार करणारे प्राध्यापक उपजिविकेचे साधन म्हणून कर्तव्य पार पाडतात. या मानसिकतेतून दोघांनाही बाहेर पडण्याची गरज आहे. आपल्या कामाशी इमान राखून संस्थेप्रती समर्पित भावना ठेवली तर विद्यार्थी व संस्थेला यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ काणे यांनी केले.तुमसर येथील सेठ नरसिंगदास मोर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल होत्या. अतिथी म्हणून संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, पालिका उपाध्यक्ष सरोज भुरे, नगरसेवक राजेश देशमुख, देवेंद्रनाथ चौबे, प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम उपस्थित होते.यावेळी कुलगुरु डॉ.काणे म्हणाले, जीवनात तीन गोष्टीला अत्यंत महत्व आहे. यात जिव्हाळा व आपुलकीचे संबंध, कामाप्रति प्रामाणिकता आणि संस्थेप्रती समर्पित भावना ठेवणे. प्रत्येकाने आपले वेगळेपण जपले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी तर शिक्षकांनी शिक्षक समजले पाहिजे. पूर्वी संसाधने नव्हती. आज संसाधने आहेत. वाहतूक नव्हती, परंतु नाते होते. आज नाते बदलत चालले आहे. नात्यांना आवर घालणे आवश्यक आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांचे नाते मित्रत्वाचे व मार्गदर्शकाचे असलेच पाहिजे. तेव्हाच संस्थेला यश प्राप्त होते. मी सांगितलेला मंत्र उपयोगात आणा. सहा महिन्यात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जिद्द, नियमित अभ्यास, कठोर मेहनतीशिवाय यश मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम यांनी केले. संचालन प्रा.रेणुकादास उबाळे, डॉ.आर.के. दिपटे, दहलीवाल यांनी केले. याप्रसंगी संस्थेतर्फे महाविद्यालयाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.सुभाष पवार यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती शुभांगी रहांगडाले, डॉ.राहुल भगत, डॉ.गोल्डी बघमार, डॉ. कोलमचंद साठवणे, डॉ.संजय आगाशे, प्रा.रेणुकादास उबाळे, प्रा.कविता लेंडे, प्रा.भारती काटेखाये, प्रा.के.आर. रामटेके, प्रा.टेंभुर्णे, प्रा.मंडपे, डॉ.एम.पी. लांबट, प्रा.सुनिल कान्होलकर, प्रा.लक्ष्मण पेटकुले, प्रा.राजेंद्र बेलोकार, प्रा.सचिन देऊळकर, प्रा.डॉ.आर.के. दिपटे, नंदू रामटेकेसह पूरण मेश्राम, राकाँ शहराध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कल्याणी भुरे, कविता साखरवाडे, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शनी मंदिरात प्रवेश मिळावा - वर्षा पटेलमहिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगून शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या, मनोहरभाई पटेल यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले त्यांनी महाविद्यालयाला भेट द्यावी. आज मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षणामुळेच मनुष्य मोठा होता. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यात केवळ विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. मुलांनीसुद्धा अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातही पुढे येण्याचे आवाहनही वर्षा पटेल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी वर्षा पटेल यांनी कुलगुरु डॉ.काणे यांना गोंदिया शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा पाहायला येण्याचे आमंत्रण दिले.