शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, कार झाडावर आदळल्याने दोन ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:50 IST

मित्राच्या वाढदिवसानिमित्त काेरंभी येथील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर भंडाराकडे येत असताना अल्टो चारचाकी वाहन झाडावर जोरदार आदळले.

देवानंद नंदेश्वर

भंडारा : मित्राच्या वाढदिवसानिमित्त काेरंभी येथील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर भंडाराकडे येत असताना अल्टो चारचाकी वाहन झाडावर जोरदार आदळले. यात दोन युवक जागीच ठार झाले. तर दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना कोरंभी ते पिंडकेपार रस्त्यावर शुक्रवारच्या मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास घडली.

राजेश सुनिल शिंगाडे (२०), रा. नवेगांव (अड्याळ) व प्रणय राष्ट्रपाल सुखदेवे (२३), रा. कोरंभी, अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये अक्षय रामप्रसाद कांबळे (२४), रा. आंबेडकर वॉर्ड बेला व अमर मनोहर बोरकर (२७), रा काेरंभी यांचा समावेश आहे.

याबाबत असे की, हर्षल सुखदेवे याचा वाढदिवस असल्याने मित्र राजेश शिंगाडे, प्रणय सुखदेवे, अक्षय कांबळे व अमर बोरकर हे चारही मित्र जेवनासाठी हिल साईड हॉटेल कोरंभी येथे गेले होते. दरम्यान जेवण आटोपल्यानंतर वाहन चालक हर्षल सुखदेव मित्रांना स्वगावी सोडण्यासाठी अल्टो क्र. एमएच ४० सीएच ८५१८ ने निघत असताना मित्रांनी भंडारा येथे चहा पिण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे रात्री दीड वाजताच्या सुमारास कोरंभी वरुन भंडाराकडे अल्टोने येत असता चालकांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन झाडावर जाेरदार आदळले. धडक एवढी जबरदस्त होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्टो वाहनाच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

जखमींवर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अक्षय कांबळे यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी वाहन चालक हर्षल धर्मपाल सुखदेवे (२७) रा. कोरंभी याच्याविरुध्द भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) तसेच मोटार वाहन कायदा सहकलम १३४, १८४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात