शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके ‘एसीबी’च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:15 IST

तुमसरमध्ये कारवाई; ७० हजाराची लाच घेताना अटक

तुमसर (भंडारा) / गोंदिया : रेतीच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे तहसीलदार संजय यादवराव रामटेके (५४) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. तुमसर तालुक्यातील माडगी येथे एका व्यक्तीला तहसीलदारांसाठी लाच घेताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर तहसीलदारांना अटक करण्यात आली.अवैध रेतीचा उपसा करणाऱ्या एका ट्रकला तहसीलदार संजय रामटेके यांनी गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जंगलात अडविले होते. ट्रक सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारकर्त्याच्या मित्राचे दोन रेती वाहतूक ट्रकसाठी महिन्याला ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर सदर तक्रारकर्त्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान मंगळवारी तुमसर तालुक्यातील माडगी येथील एका हॉटेलात सापळा रचण्यात आला. त्यावेळी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विपील सिद्धार्थ कुंभारे (२९) रा.माडगी (तुमसर) याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या जबाबावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसीलदार संजय रामटेके यांना तिरोडा येथील तहसील कार्यालयातून ताब्यात घेतले. या दोघांना तुमसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथील उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, गणेश पदवाड आदींनी केली.  

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग