शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराची दुचाकीला धडक, तरुणाचा गेला जीव

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 14, 2023 12:44 IST

या मार्गवर नेहमीच रानडुक्कर आडवे येऊन अपघात होत असतात

भंडारा : मित्रासोबत कोंढा येथून काम आटोपून राहते गाव पहेला येथे जात असताना डॉ. अरुण मोटघरे कॉलेज जवळ रानडुक्कर रस्त्यावर आडवा येऊन मोटरसायकलला जबर धडक दिली. यामुळे मनोज तुकाराम देशमुख (२३, पहेला, ता. भंडारा) हा युवक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान भंडारा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

मनोज देशमुख हा मित्र स्वप्नील मलोडे यांचेसोबत १२ सप्टेंबरच्या रात्री ८.४५ वाजता दुचाकीने (एच ३६ एई ०७५३) पवनी तालुक्यातील कोंढा येथून काम आटोपून रात्री ८.३० वाजता पहेला येथे जाण्यास निघाले. दरम्यान मार्गातील डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ते चुऱ्हाड फाट्यादरम्यान रानडुक्कर आडवा आला. यामुळे दोघेही मित्र रोडवर पडले. यात मनोजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला भंडारा येथील खासगी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान १३ सप्टेंबरला दवाखान्यात निधन झाले. या प्रकरणी अड्याळ पोलिस स्टेशन कलम १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार सुभाष मस्के करीत आहे.

अड्याळ ते कोंढा या राष्ट्रीय मार्ग क्र.२४७ वर काही भागात जंगल आहे. तसेच दुतर्फा धानाची शेती आहे. यामुळे राकनडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या मार्गवर नेहमीच रानडुक्कर आडवे येऊन अनेक अपघात झाले आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbhandara-acभंडारा