शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तीन एकरातील धानासह ट्रॅक्टर व मळणी यंत्र भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 22:54 IST

मळणी सुरू असातना अचानक ट्रॅक्टरमधून उडालेली ठिणगी धान पुंजण्याच्या ढिगावर पडली. काही कळायच्या हात आग लागली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने काही वेळातच धान पुंजणे, मळणी आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. यात १५ लाखांचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मळणी करताना ट्रॅक्टरमधून उडालेल्या ठिणगीने लागलेल्या आगीत तीन एकरातील धानासह ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जाळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील सरांडी बुज. येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने पसरलेल्या आगीत सर्व जळून गेले. यात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सरांडी येथील शेषराव समरीत यांच्या शेतातील धानासह दिनेश ठाकरे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर होते. शेतकरी शेषराव समरीत यांची चार एकर शेती आहे. खरिपात लागवड केलेल्या धानाची काही दिवसापूर्वी कापणी करून पुंजणे बांधून शेतात ठेवले होते. शनिवारी त्यांच्या शेतात मळणीसाठी दिनेश ठाकरे यांचे ट्रॅक्टरवरील मळणी यंत्र आणले. धानाच्या गंजीजवळ मळणी यंत्र लावून धानाची मळणी सुरू केली. सुमारे एक एकरातील धानाची मळणी होऊन ५० पोते धान काढण्यात आले.  मळणी सुरू असातना अचानक ट्रॅक्टरमधून उडालेली ठिणगी धान पुंजण्याच्या ढिगावर पडली. काही कळायच्या हात आग लागली. उपस्थित शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने काही वेळातच धान पुंजणे, मळणी आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. यात १५ लाखांचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

आठवडाभरात तालुक्यातील दुसरी घटना- धानाची मळणी करताना आग लागण्याची आठवडाभरातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. १२ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील रोहनी येथे आनंदराव समरीत यांचे धान पुंजणे, ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक झाले होते. आगीच्या घटनांनी शेतकरी धास्तावले आहेत.

 

टॅग्स :fireआगagricultureशेती