शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीने चिरडून वरिष्ठ रेल्वे अभियंता जागीच ठार; मेगा ब्लॉक दरम्यान कर्तव्यावर असताना पहाटे घडला अप

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 7, 2024 15:02 IST

रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता.

भंडारा : मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक करण्यात होता. या काळात कर्तव्यावर असताना अप मार्गाने जाणाऱ्या मालगाडीखाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी पहाटे ५:१० वाजताच्या दरम्यान घडला. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली. अजयकुमार रघुवंशी (५१) असे मृत रेल्वे अभियंत्याचे नाव आहे.

रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या कायात तुमसर रोड येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता (रेलपथ) अजय कुमार रघुवंशी हे रेल्वे ट्रॅकवर कर्तव्य बजावत होते. ट्रॅक दुरुस्तीकरिता रेल्वेचे व खाजगी कंत्राटदाराचे सुमारे ७० ते ८० कामगार कार्यरत होते. दरम्यान रघुवंशी हे अपमार्ग ओलांडून पलीकडे सौचाकरिता जात होते. एवढ्यात अपमार्गावरून येणाऱ्या मालगाडीने त्यांना धडक दिली. त्यात चिरडून ते जागीच ठार झाले.हा प्रकार जवळच काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच एकच धावपळ उडाली. घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून त्यांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.वर्षभरापूर्वीच आले होते बदलून

अजय कुमार रघुवंशी हे यापूर्वी चंद्रपूर येथे कार्यरत होते एक वर्षांपूर्वीच ते तुमसर रोड येथे बदलून आल्यावर रुजू झाले होते. कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावाचे ते सर्वपरिचित होते. त्यांच्या मृत्यूने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे