शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 14, 2023 12:30 IST

लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना

भंडारा : सकाळच्या सुमारास सायकलने शाळेत जात असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची धडक बसली. या अपघातात शाळकरी बालक जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील मीरा कन्हैय्या मंगल कार्यालय परिसरात घडली. मोहित सुनिल येवले (१४, लाखांदूर) असे जखमी शाळकरी बालकाचे नाव आहे.

गुरूवारी बैल पोळा सण असल्याने शाळा सकाळ पाळीची ठेवली होती. यासाठी मोहित सकाळच्या सुमारास सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मागेहुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची मोहितच्या सायकलला धडक बसली. यात तो रस्त्यावर पडला. अपघात झाल्याचे पाहून अज्ञात चारचाकी वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मोहित स्थानिक लाखांदूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ईयत्ता ८ व्या वर्गाचा विद्यार्थी आहे.

या अपघाताची माहिती या मार्गावरील प्रवाशांनी जखमी मोहितला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताची माहिती होताच भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान, लाखांदूरचे नगरसेवक रज्जू पठाण, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश खोब्रागडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन राठोड, शिक्षक तोषित नाकतोडे, संजय प्रधान यासह आणि शिक्षकांनी रुग्णालयात येऊन भेट घेतली. या अपघाताची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीbhandara-acभंडारा