शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:07 IST

लाखांदूर तालुक्यातील ढोलसर शेत शिवारातील घटना

गोपालकृष्ण मांडवकर 

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर शेत शिवारात शुक्रवारी १६ जूनच्या पहाटे साडेचार वाजताच्या सकाळच्या सुमारास विकास शंकर नान्हे (२८, ढोलसर) हा युवक शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. घरामागील शेतशिवारात पहाटे शौचास गेलेल्या एका महिलेला हा प्रकार दिसला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास गावातील एक महिला शेतशिवारात शौचास गेली असता मधुकर बेदरे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला विकासने लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेला दिसला. हा प्रकार पाहिल्यावर घाबरलेल्या अवस्थेत तिने कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी सबंधितांना माहिती देऊन पोलिसात कळविले. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, हवालदार विलास मातेरे, अंमलदार टेकचंद बुरडे, वाहनचालक भुपेश बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.

विलासने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप कळु शकले नाही. तो आपली आई गोदावरी यांच्यासोबत गावातच राहत होता. आई आणि तो दोघेही मजुरीचे काम करायचे. दरम्यान, विकासला दारू पाणी पिण्याचे व्यसन लागले होते. अलिकडे त्याची प्रकृती नेहमी बिघडत असायची, अशी माहिती आहे. लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूbhandara-acभंडारा