शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लाखनी तालुक्यातील ९७ हजार २३६ नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:00 AM

लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ९७ हजार २३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार ४८ हजार ९६७ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ४८ हजार २६९ आहे. तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सालेभाटा पंचायत समिती गणामध्ये ८ हजार १२८ मतदार, तर लाखोरी पंचायत समिती गणामध्ये ७५०४ मतदार आहेत.

चंदन मोटघरे लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात  जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच नगरपंचायतच्या निवडणुकीमुळे  थंडीच्या दिवसांतही राजकीय वातावरण तापले आहे. २१ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  नगरपंचायतचे नामनिर्देशन स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे.  नामनिर्देशनपत्राची छाननी ७ डिसेंबर व नगरपंचायतची ८ डिसेंबरला छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ९७ हजार २३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार ४८ हजार ९६७ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ४८ हजार २६९ आहे. तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सालेभाटा पंचायत समिती गणामध्ये ८ हजार १२८ मतदार, तर लाखोरी पंचायत समिती गणामध्ये ७५०४ मतदार आहेत. मुरमाडी (सावरी) जिल्हा परिषद क्षेत्रातील पिंपळगाव (सडक) पंचायत समिती गणामध्ये ८३२६ मतदार व मुरमाडी (सावरी) पंचायत समिती गणामध्ये ८३६५ मतदार  मतदान करणार आहेत. केसलवाडा (वाघ) जिल्हा परिषद क्षेत्रातील गडेगाव पंचायत समिती क्षेत्रात ७५६० मतदार व केसलवाडा (वाघ) पंचायत समिती गणात ६९३१  मतदार मतदान करतील.पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रातील पोहरा पंचायत समिती क्षेत्रात ७६१९ व कनेरी (दगडी) पंचायत समिती क्षेत्रातील  ८७२५ मतदार मतदान करणार आहेत. मुरमाडी (तुपकर) जिल्हा परिषद क्षेत्रातील मुरमाडी (तुपकर) पंचायत समिती क्षेत्रात ८४९० मतदार व मेंढा (टोला) पंचायत समिती  गणात ८१५५  मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालांदूर (चौरास) जिल्हा परिषद क्षेत्रात किटाडी पंचायत समिती क्षेत्रात ८८३३ मतदार व पालांदूर (चौ.) पंचायत समिती क्षेत्रात ८६०० मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यातील ६ जिल्हा परिषद क्षेत्र व १२ पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणुकीत लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रात १८, मुरमाडी (सावरी) ९, केसलवाडा (वाघ) १४, पोहरा २०, मुरमाडी (तुपकर) १८, पालांदूर (चौ.) २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ७१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.लाखनी नगरपंचायतमध्ये १२ हजार ५९१ मतदार- लाखनी नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबरला लाखनी शहरातील १७ प्रभागांमध्ये पार पडणार आहे. १९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ४ करिता दोन पोलिंग बुथ ठेवण्यात आले आहेत. इतर १५ प्रभागांसाठी प्रत्येकी एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. नगरपंचायतमध्ये १२ हजार ५९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या ६४४७ आहे. पुरुष मतदारांची संख्या ६१४४ आहे.         नगरपंचायत निवडणुकीत महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद