प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९४ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:23+5:302021-05-07T04:37:23+5:30

एकोडी : मनात प्रबळ इच्छाशक्ती असली की, माणूस कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो तसेच आलेल्या संकटांवरही निश्चितच मात करू ...

The 94-year-old grandfather overcame Corona on the strength of strong will | प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९४ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९४ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

Next

एकोडी : मनात प्रबळ इच्छाशक्ती असली की, माणूस कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो तसेच आलेल्या संकटांवरही निश्चितच मात करू शकतो. असेच एक उदाहरण साकोली तालुक्यातील एकोडी येथे घडले. एकोडी येथील नारायण राजाराम खेडीकर यांना कोरोनाची लागण झाली होती. वयाच्या ९४ व्या वर्षीही नारायण हे तंदुरुस्त होते. व्यायाम व पायी चालण्याचा त्यांचा सराव होता. अचानक कोरोनाची लागण झाली. मनात कुठलीही भीती न ठेवता औषधोपचार तसेच आयुर्वेदिक औषधांचा वापर करून त्यांनी कोरोनावर मात केली. सध्या नारायण खेडीकर हे ठणठणीत बरे झाले असून, इतरही लोकांना कोरोनाच्या संकटातून कसे बाहेर पडता, याविषयी ते निश्चित मार्गदर्शन करीत आहेत. वयाच्या ९४ व्यावर्षी बिनधास्तपणे कोरोनावर मात केलेल्या नारायण खेडीकर यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: The 94-year-old grandfather overcame Corona on the strength of strong will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.