शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८३.४० टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ८१.२१ टक्के आहे.

ठळक मुद्देभंडारा पाटबंधारे विभाग, गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन टक्के जलसाठा कमी

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ मध्यम, लघु, जुने मालगुजारी प्रकल्पात शनिवार रोजी ८३.८५ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत २.५७ टक्के कमी आहे. तर २०१८ मध्ये जलसाठा ६४.७९ टक्के एवढा होता.भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. परिणामी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील जलसाठा अधिक आहे. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्पाचा समावेश आहे.२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८३.४० टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ८१.२१ टक्के आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जुलै महिन्यात कोरडेठण्ण असलेल्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा मुबलक साठा आहे.सध्यस्थितीत उच्च प्रतीच्या धानाला एका पावसाची गरज आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पातील पाणी धान पिकासाठी संजीवनी ठरणार आहे. बहुतांश माजी मालगुजारी तलावाचे देखभाल दुरूस्ती नसल्याने येथील पाणी व्यर्थ जात असल्याचे देखील निदर्शनास येते. येत्या वर्षात मामा जलाशयांचे दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.१७ प्रकल्पात शतप्रतिशत जलसाठायावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्यात काही दिवस झालेल्या पावसाने जलाशयात मुबलक जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात १०२.५० दलघमी उपयुक्त साठा आहे. एका जलाशयात २५ टक्केपर्यंत, पाच प्रकल्पात २५ ते ५० टक्के, नऊ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के, ३१ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के तर १७ प्रकल्पात शतप्रतिशत जलसाठा आहे. शंभर टक्के पाणी असलेल्या १७ प्रकल्पांमध्ये डोंगरला, कारली, सिवनीबांध, भुगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार, सावरबंध, खंडाळा, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, कनेरी, चान्ना, लोभी, चप्राड आदींचा समावेश आहे. प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पChandpur Lakeचांदपूर जलाशय