शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

जिल्ह्यात २४ तासात ८३.९ मिमी अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्हळगाव आदी भागात बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यात २४ तासात १६.५ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देगारांचा वर्षाव । सर्वाधिक पाऊस लाखांदूर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत महिनाभरापासून जिल्ह्यात एक दिवसाआड अवकाळी पाऊस बरसत असून गत २४ तासात तर तब्बल ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात गारांचा वर्षाव झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लाखांदूर तालुक्यात ३०.२ मिमी नोंदविण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या रबी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.भंडारा शहरात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्हळगाव आदी भागात बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यात २४ तासात १६.५ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी मंडळात २२.४ मिमी, वरठी ७.२ मिमी, करडी ३.४ मिमी, कांद्री १८.४ मिमी, कान्हळगाव २७.५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तुमसर तालुक्यात २४ तासात २९.४ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गर्रा मंडळात ४१ मिमी नोंदविण्यात आला. नाकाडोंगरी ५.३ मिमी, तुमसर १२.१ मिमी, सिहोरा ३०.१ मिमी, मिटेवानी २६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यातील पवनी मंडळात ३८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यासोबतच आसगाव १६.४ मिमी, आमगाव २१.२ मिमी, कोंढा ३.६ मिमी, चिचाळ ९१ मिमी पाऊस कोसळला. साकोलीत १६.४ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात साकोली मंडळात १७.२ मिमी, एकोडी ७.२ मिमी, सानगडी २५ मिमी पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातील पोहरा मंडळात २३.४ मिमी, लाखनी ७.२ मिमी, पालांदूर २७.८ मिमी, पिंपळगाव १२.४ मिमी पाऊस कोसळला. लाखांदूर तालुक्यात गत २४ तासात ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून लाखांदूर मंडळात २९ मिमी, बारव्हा ३५.४ मिमी, मासळ ३३ मिमी, विरली २३ मिमी पावसाची नोंद झाली.काढणीला आलेल्या पिकांना फटकाभंडारा जिल्ह्यात सध्या रबी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा लाखोळी, वाटाणा आदी पिकांची कापणी करून शेतात ढिग लावून ठेवले आहे. मात्र गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणांसह पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी रात्री तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतातील कापून ठेवलेले पीक ओले झाले. अनेक शेतकऱ्यांनी ताडपत्रीने पीक झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु वादळामुळे ताडपत्र्या उडून गेल्या.तालुकानिहाय पाऊसभंडारा १.६ मिमी, मोहाडी १६.५मिमी, तुमसर २९.४ मिमी, पवनी २०.५ मिमी, साकोली १६.४ मिमी, लाखांदूर ३०.२ मिमी, लाखनी १७.७ मिमी

टॅग्स :Rainपाऊस