शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 17:59 IST

नवभारत साक्षरता कार्यक्रम : चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

भंडारा : उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील नोंदणीकृत ८८२० पैकी ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी निरक्षरतेचा कलंक पुसून टाकला आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी राज्यस्तरावरून २०२२-२३ व २०२३-२४ साठी ९१६९ असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८८२० नवसाक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी करण्यात आली. १७ मार्च रोजी जिल्ह्यातील ७५५ परीक्षा केंद्रांवर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ८८२० नोंदणीकृत असाक्षरांपैकी ५६६ असाक्षर परीक्षेला गैरहजर होते. तर ८२२२ (९३.२२ टक्के) नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत. त्यात २८७२ पुरुष व ५३५० महिलांचा समावेश आहे.

या परीक्षेसाठी १५ ते ३५ वयोगटातील ११४०, ३६ ते ६५ वयोगटातील ५६०८ व ६६ वर्षांवरील १५०६ नवसाक्षरांचा समावेश होता.जात प्रवर्गनिहाय अनुसूचित जातीचे ९४४, अनुसूचित जमातीचे ९६०, इतर मागासवर्गीय ६२२३, अल्पसंख्याक ४८ व सर्वसाधारण प्रवर्गातील ७९ नवसाक्षर परीक्षेला बसले होते. मात्र, ३२ नवसाक्षरांना या परीक्षेत ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाल्याने त्यांना आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेत पुन्हा संधी दिली जाणार आहे.

असा आहे जिल्ह्याचा निकाल

तालुका प्रविष्ट उत्तीर्ण सुधारणा आवश्यकभंडारा  - १६७७ १६५९ १८मोहाडी  - ११४६ ११४६ ००तुमसर  - १५१३ १५१३ ००साकोली  - ८७१ ८७१ ००लाखनी  - १००६ १००४ ०२लाखांदूर  - ९५० ९५० ००पवनी  - १०९१ १०७९ १२एकूण - ८२५४ ८२२२ ३२

जिल्ह्यात शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा डायटचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या कामी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली. आगामी शैक्षणिक वर्षात सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात नवसाक्षरांसाठी डिजिटल, आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, भंडारा.

 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र