पुलाचे बांधकाम होणार : जिल्ह्यातील सात गावांचा समावेशरंजित चिंचखेडे भंडारा धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाने बाधीत होणाऱ्या वैनगंगा नदी काठालगत शेत शिवारात पुल आणि रस्ते बांधकामासाठी आठ कोटींचा निधी मंजुर झालेला असून यात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे.सिहोरा परिसरातून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ४५० कोटी रूपये खर्चून धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात साठवणूक करण्यात येणाऱ्या पाळ्याचा उपसा गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन योजना व अदानी विज प्रकल्प करित आहे. या नदीवर योजना आणि प्रकल्पाचे स्वतंत्र पंपगृह लावण्यात आले आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने वैनगंगा नदी काठालगत असणारे नाले व शेतशिवार तुडूंब पाण्याने भरली आहेत. यामुळे नाल्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतशिवारात ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. नाल्यात पाचफुट पेक्षा अधिक पाणी असल्याने शेतकऱ्यांना जिकरीचे ठरत आहे. या पाण्याने बाधीत होणारे सिहोरा परिसरातील चार गावे असून तिरोडा तालुक्यातील तीन गावांचा यात समावेश आहे. या गावात उपसा सिंचन योजना तिरोडा अंतर्गत पुल आणि रस्ते बांधकामाचा सर्वेक्षण करण्यात आलेला आहे. परंतु निधी अभावी गेल्या अनेक वर्षापासून या विकास कामाचे बांधकाम झाले नाही. देवरी देव गावात स्मशानभूमी कडे जाणाऱ्या नाल्यात पाच फुट पाणी असल्याने प्रेत नेताना गावकऱ्यांना सकंटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे गृहगावात गावकऱ्यांना समस्यांना सामोरे जाण्याची पाळी आल्याने सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास सुरू असताना त्यांनी सातत्याने पत्र व्यवहारातुन शेतकऱ्यांची समस्या व कैफियत मांडली आहे.दरम्यान शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी सिहोरा परिसरातील देवरी देव ते नदीघाट पर्यंत जाणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ८ लाख ७४ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या शिवाय देवरी देव ते नर्सरीपर्यंत नाला करिता १ कोटी ६ लाख ४१ हजार रूपये, देवरी देव ते सुकडी नकुल या गावांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम ६२ लाख ७५ हजार रूपये, चुल्हाड ते नदी घाटपर्यंत पुल व पोच रस्ता ४७ लाख ८६ हजार, माता बम्बलेश्वरी मंदीर शेजारी सुकडी नकुल येथील पुल बांधकाम ३८ लाख ६२ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.
नदी काठावरील गावांना आठ कोटींचा निधी मंजूर
By admin | Updated: February 23, 2016 00:19 IST