शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

63 प्रकल्पात 74.80 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ७८.४६ टक्के जलसाठा हाेता. यावर्षी चांदपूर प्रकल्पात ८७.२९ टक्के, बघेडा ८३.९६, बेटेकर बाेथली प्रकल्पात ८३.१७ टक्के, साेरणा प्रकल्पात ७७.२२८ टक्के जलसाठा हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ६३ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत ७४.८० टक्के जलसाठा आहे. मात्र शेवटच्या चरणात काेसळलेल्या पावसाने जलसाठ्यात वाढ झाली असून, सात लघु प्रकल्प आणि १५ मामा तलाव १०० टक्के भरले आहे. यामुळे याेग्य नियाेजन केल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पााणी उपलब्ध हाेऊ शकते.भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ७८.४६ टक्के जलसाठा हाेता. यावर्षी चांदपूर प्रकल्पात ८७.२९ टक्के, बघेडा ८३.९६, बेटेकर बाेथली प्रकल्पात ८३.१७ टक्के, साेरणा प्रकल्पात ७७.२२८ टक्के जलसाठा हाेता. या प्रकल्पातून पाण्याचे याेग्य नियाेजन केल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध हाेणार आहे.जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून, या प्रकल्पाची संकल्पीय उपयुक्त क्षमता ५३.५४ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात ३६.६५ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ६८.४६ आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.३६ टक्के जलसाठा हाेता. जिल्ह्यातील २८ मामा तलावही यावर्षी तुडुंब भरले आहे. मामा तलावात सध्या २१.२० दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी ८३.४७ आहे. गतवर्षी ६३.९७ टक्के जलसाठा हाेता.जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी याेग्य नियाेजनाअभावी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहाेचत नाही. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते.

सात लघु प्रकल्प आणि १५ मामा तलाव तुडुंब- जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांपैकी सात प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहे. त्यात तुमसर तालुक्यातील परसवाडा, माेहाडी तालुक्यातील टांगा, पवनी तालुक्यातील वाही, पिलांद्री, साकाेली तालुक्यातील गुढरी, लाखनी तालुक्यातील मुरमाडी हमेशा, वाकल या लघुप्रकल्पांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील २८ पैकी १५ मामा तलाव १०० टक्के भरले आहे. त्यात साकाेली तालुक्यातील चांदाेरी, पाथरी, सावरबंध, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, रेंगेपार काे., लाखनी तालुक्यातील कनेरी, चान्ना, तुमसर तालुक्यातील लाेभी आणि लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राड व इंदाेरा मामा तलावांचा समावेश आहे.

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प