शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

खरीप हंगामासाठी ७० हजार २१० मेट्रिक टन खत साठा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा ...

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ८३ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून, एक लाख ९५ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे राहणार असून, २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धान, तर तूर पीक ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात महापूर, तुडतुडा रोगाने, अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे १ लाख १७ हजार ७०९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यात गतवर्षीचा २३ हजार ८१३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तर यावर्षी नव्याने मंजूर झालेला ७० हजार २१० मेट्रिक टन म्हणजेच एकूण ९४ हजार २३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र धारकांनी खताची विक्री पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक उपलब्ध झाली आहेत.

जिल्ह्यात खरिपाच्या मशागत कामांना वेग आला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आढावा सभा तसेच खरिपातील विविध पिकांच्या नियोजनाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे एकही शेतकरी बियाणे अथवा खतापासून वंचित राहणार नाही, यासाठी आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

बॉक्स

कृषी केंद्रांना ऑनलाइन खते विक्री अनिवार्य

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन खतांच्या प्रिंटेड एमआरपीनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची विक्री करावी. याकरिता पॉस मशीनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्रांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्यात आले असून, ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे खते बियाणे देतानाच शेतकऱ्यांना याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी केंद्रांना सांगण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकरी सन्मान कक्षातून होणार तक्रारींचे निवारण

शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासोबतच खते, बियाण्यांबाबतची कोणतीही तक्रार तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समिती कृषी विभाग अथवा जिल्हा स्तरावरील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच त्यानुसार वरिष्ठांकडून चौकशी करीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोट

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७० हजार २१९ मेट्रिक टन मंजूर झाला आहे. याशिवाय २०२० - २१चा खतसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात कुठेही खताची टंचाई भासणार नाही. यासोबतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदुराव चव्हाण,

जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा