शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

६९ पशुधनांचा ‘सातवा महिना’

By admin | Updated: April 30, 2017 00:23 IST

शीर्षक वाचून बहुदा आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या चमूने पशुधनांचा सातवा महिना साजरा केला, ...

पशुपालकांना दिली भेटवस्तू : मानेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपक्रमप्रशांत देसाई भंडाराशीर्षक वाचून बहुदा आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या चमूने पशुधनांचा सातवा महिना साजरा केला, आणि तोही धूमधडाक्यात. आजपर्यंत आपण गर्भवती महिलांचाच सातवा महिना होत असल्यासे बघितले. परंतु मानेगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांच्या कल्पनेतून हा अभिनव ‘सातवा महिना’ शनिवारला जागतिक पशुवैद्यकीय दिनाचे औचित्य साधून मानेगाव येथे पार पडला.एखाद्या घरात सनई चौघडे वाजल्यानंतर काही महिन्यात त्या घरी पाळणा हालण्याची तयारी सुरू होते. मुलीला दिवस गेल्यानंतर भारतीय संस्कृतीनुसार ‘सातवा महिना’ मोठ्या आनंदात साजरा केल्या जातो. मात्र, पाळीव पशुधनांचा सातवा महिना साजरा केला असे कोणी म्हटल्यास त्यावर विश्वास बसणार नाही किंवा सांगणाऱ्यांना मुर्खात काढण्यात येईल. परंतु हे सत्य आहे. भंडारा येथे एक, दोन नाही तर तब्बल ६९ पाळीव पशुधनांंचा सातवा महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मानेगांव (बाजार) येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे केवळ गायींचाच नाही तर म्हशींचाही सातवा महिना कार्यक्रम राबविला. यात गावातील ज्या गायी-म्हशी सात महिन्याच्या गरोदर आहेत, अशा ५७ गायी व १२ म्हशीच्या पशुपालकांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रथम त्यांना यावर विश्वास बसला नाही, मात्र, डॉ. भडके यांनी त्यांचा विश्वास संपादन करून या कार्य्रमाचे यशस्वी आयोजन केले. गावातील ज्या गायी-म्हशी गरोदर आहेत, अशा पशुधनांना पशुपालकांनी कार्यक्रमात आणले. तिथे सर्वांची पुजाअर्चा करण्यात आली. यावेळी गरोदर गायी-म्हशी यांना देण्यासाठी पशुपालकांना खनिजमिश्रण, जंतनाशक गोळी व भेटवस्तू देण्यात आली. यावेळी सरपंच प्रभाकर बोदेले, नत्थू बांते, धनराज शेंदरे, नरेंद्र मेश्राम, राहुल खोब्रागडे, भाग्यवंत लांजेवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पशुधनांचा सातवा महिना कार्यक्रम राबविण्याचा हा कदाचित देशातील पहिलाच उपक्रम ठरला.सातव्या महिन्यामागे वैज्ञानिक कारणपुरातन काळापासून महिलांचा सातवा महिना साजरा करण्याची परंपरा आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. सात महिन्यांपर्यंत आईच्या गर्भात बाळाची वाढ ६० टक्केपर्यंत होते. शेवटच्या तीन महिन्यात चांगली वाढ व्हावी याकरिता विशेष पोषणयुक्त आहार देण्यात येते. शरीरातील हिमोग्लोबिन व प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन आई व बाळ यांची प्रकृती धोक्यात येऊ नये, हे या मागील मुख्य कारण आहे. सातवा महिन्यानंतर गरोदर मातेला मार्गदर्शन व सकस आहाराचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येते. हेच कारण पशुधनांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.सातव्या महिन्यांपासून गायी-म्हशींचे दूध काढणे बंद होते. त्यामुळे दूध नाही तर पशुखाद्य नाही, अशी पशुपालकांची धारणा होते. मात्र, सातव्या महिन्यांपासून गरोदर पशुधनाला पोषक पशुखाद्य मिळायला पाहिजे. तरच दुधाची झीज भरून निघते. बाळाची वाढ चांगली होते, गर्भारपणात बाळ सुदृढ राहते. प्रसुतीदरम्यान बाळ अडणे, जार न पडणे या आजारापासून मुक्ती होते. या सर्व बाबींची माहिती पशुपालकांना व्हावी व पशुधनांचा सातवा महिना कार्यक्रम राबवावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.- डॉ. गुणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, मानेगावं.