शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
4
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
5
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
6
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
7
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
8
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
9
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
10
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
11
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  
12
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
13
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
14
राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत
15
आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता
16
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
17
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
18
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
19
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
20
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

आधार क्रमांक मागून ६५ हजारांनी गंडविले

By admin | Published: July 13, 2017 12:25 AM

‘तुमचा एटीएम बंद होईल, त्याकरिता आधार क्रमांक तात्काळ सांगा’ असा भ्रमणध्वनीवरून संदेश आला.

बचत खात्यातून काढले पैसे : पोलिसात व बँकेत फसवणुकीची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘तुमचा एटीएम बंद होईल, त्याकरिता आधार क्रमांक तात्काळ सांगा’ असा भ्रमणध्वनीवरून संदेश आला. आधार क्रमांक सांगितल्यावर बचत खात्यातून सातवेळा ६५ हजार रूपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार येरली येथील विनोद शालीकराम पटले यांच्यासोबत घडला. याप्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून स्थानिक सेंट्रल बँकेतही लेखी तक्रार दाखल केली आहे.येरली येथील रहिवासी विनोद पटले व पत्नीच्या नावे तुमसर सेंट्रल बँकेच्या शाखेत एकत्रित खाते आहे. ८ जुलै रोजी पटले यांना दुपारी २ वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी क्रमांक ९७०९८१८७१७ वरून फोन आला. मी बँकेतून बोलत आहे, असे सांगून ‘तुमचा एटीएम बंद होईल त्याकरिता तुमचा आधार क्रमांक सांगा’ असा फोन आला. एटीएम बंद होईल, या भीतीने पटले यांनी संबंधिताला आधार क्रमांक सांगितला. त्यानंतर विनोद पटले यांच्या भ्रमणध्वनीवर ६५ हजार रूपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला. १० जुलै रोजी सेंट्रल बँक आॅफ इंडिया तुमसर शाखेत पासबुकची प्रिंट केली. त्यात ६५ हजार रूपये कमी दाखविण्यात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनोद पटले यांनी तुमसर पोलीस ठाण्यात व स्थानिक सेंट्रल बँकेच्या तुमसर शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. पटले हे कुक्कुटपालनाचा घरगुती व्यवसाय करतात. कॅशलेस व डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशात ग्रामीण भागातील जनतेची अशी फसवणूक होत आहे. हा गुन्हा सायबर क्राईमच्या कक्षेत हा मोडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.विनोद पटले यांची लेखी तक्रार प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार पाठविण्यात आली आहे. कारवाईसंदर्भात आताच काही सांगता येत नाही. देशात अशा फसवणुकीचा प्रकार सुरू असून खातेदारांनी सतर्क राहण्याची गरज आहे.-डी.एन. पाचपुते, व्यवस्थापक, सेंट्रल बँक, तुमसर.