शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ महिन्यांत ६० जणांनी कवटाळले मृत्यूला शेतकरी आत्महत्या थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:46 IST

Bhandara : शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून गणला जातो. मात्र, परिस्थितीने खचलेल्या बळीराजाची आर्त हाक शासन-प्रशासन ऐकत नसल्याने विविध कारणांनी तो मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात गत १५ महिन्यांत ६० शेतकऱ्यांनी विविध मार्गानी या जीवन संपविले. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबणार कधी, हा प्रश्न कायम आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारा : जिल्हा तांदळाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या तांदळाच्या कोठारातून दरवर्षी लाखो क्विंटल धानाचे उत्पादन होते. राज्यातच नव्हे, तर देशभरात हा तांदूळ निर्यात केला जातो. तांदूळ पिकविणाऱ्या बळीराजाचे हाल व त्यांची स्थिती अजूनही बदललेली नाही. २५ वर्षाचा आकडेवारीवर नजर घातल्यास ७७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात कुणी कर्जाच्या विवंचनेत, तर कुणी पिकाची नासाडी झाली म्हणून आत्महत्या केली. सरकारी बँका, सहकारी पतसंस्था, हातउसने व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे, याच कारणांनी बळीराजा त्रस्त असतो.

खरीप हंगाम सुरू झाला की बी-बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभारावा, याच विचारात गुंतलेला असतो. यातूनच शासन प्रशासन व बँकेचे उंबरठे गाठल्यानंतर कर्ज न मिळाल्यास तो सावकाराच्या दारी जातो. अशावेळी त्याची पिळवणूक केली जाते. विशेष म्हणजे, अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

कीड व रोगांचा प्रादुर्भावधान गर्भात असताना त्यावर रोग व किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. महागडी औषधे वापरूनही प्रकोप जात नाही. अशावेळी उत्पादन अत्यल्प निघते. आधीच डोक्यावर कर्जाचे डोंगर व उत्पादनही न निघाल्याने बळीराजा अधिकच खचत जातो. याच विवंचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

कसा करावा उदरनिर्वाह ?रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात धान लागवडीचे क्षेत्र अधिक असते. मात्र, घडाईपेक्षा मडाई जास्त असल्याने लागवडीला लागणारा खर्चही निघत नाही. अशावेळी धानाची शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. सावकाराचे कर्ज, घराचा प्रपंच, मुलीचे लग्न, शिक्षण अशा विविध बाबींवर खर्च कसा उचलायचा, असा प्रश्न अन्य लोकांसारखा बळीराजासमोरही उपस्थित होतो.

हमी केंद्र वेळेवर उघडावेदरवर्षी १ आक्टोबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ होत असतो. मात्र, धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नाही. गतवर्षीही तब्बल दीड महिना विलंबाने धान खरेदी केंद्र सुरू झाले. अशावेळी खासगी व्यापाऱ्यांना धान विकल्याशिवाय बळीराजासमोर पर्याय उपलब्ध नसतो. पदरात जेवढे मिळतील तेवढे पैसे ते घेतात. परिणामी, आधारभूत धान खरेदी केंद्र उघडूनही त्याचा खऱ्या अर्थाने लाभ शंभर टक्के लाभ मिळत नाही. यावरही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी