शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानघाट परिसरात दोन युवकांजवळ आढळला ६ किलो गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 15:52 IST

पोलिसांनी उघडकीस आणली भंडाऱ्यातील गांजा तस्करी : दोन्ही युवक लाखांदूर तालुक्यातील

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : दुचाकीने आलेल्या दोन युवकांकडून गांजा तस्करी होत असल्याच्या गोपनिय माहितीवरून भंडारा पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री स्मशानभूमी परिसरात अटक केली. त्यांच्याकडून बोरीत भरलेला ६ किलो गांजाही जप्त केला असून त्याची किंमत ६० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.

लाखांदूर तालुक्यातील येथील महेश ठवरे (२८, अंतरगाव/ चिचोली, ता. लाखांदूर) आणि प्रणय मेश्राम (१९, इंदोरा, ता. लाखांदूर) अशी या युवकांची नावे आहेत. गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी दुपारीच मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान, रात्री उशिरा स्मशानभूमी परिसरात भंडारा पोलिसांनी त्यांना गांजासह रंगेहाथ पकडले. सुपारे ६० हजार रुपये किंमतीचा ६ किलो गांजा आणि दुचाकी (एमएच ३६, एव्ही १३१७) असा १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या दोघांवरही विविध कलमांखाली गुन्हे नोंदवून अटक केली आहे.

लाखांदुरातील युवकावर दुसरी कारवाई

दरम्यान मागील दोन तीन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील गवराला येथील एका युवकास गांजा विकताना पुणे पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेला दोन दिवस लोटत नाही तोच पुन्हा एकदा लाखांदूर तालुक्यातील दोन युवकांना गांजा तस्करी करतांना भंडारा पोलिसांनी अटक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थbhandara-acभंडाराArrestअटक