शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील ५५ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल अजूनही अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:59 IST

निधी संपला : प्रतीक्षा किती वर्षे करावी लागणार

देव्हाडी : रेल्वे उड्डाण पुलावर सुमारे ५५ कोटींचा निधी जागतिक बँक व रेल्वेने संयुक्तरीत्या खर्च केला. उड्डाण पुलावरून वाहतूक सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली; परंतु अद्याप त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. याकरिता निधी शिल्लक राहिला नाही, अशी माहिती उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणून याकरिता आता मंत्रालयातून मंजुरीची गरज आहे. परंतु हे मंजुरी आणणार कोण? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. दिवाळीच्या सनापूर्वी हा उड्डाणपूल प्रकाशमान करण्याची गरज आहे.

मुंबई हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे ५३२ क्रमांकाच्या रेल्वे फटकावर जागतिक बँक व रेल्वे मंत्रालयाने संयुक्तरीत्या सुमारे ५५ कोटींच्या निधी खर्च करून उड्डाणपुलाचे बांधकाम केले. रामटेक गोंदिया हा राष्ट्रीय महामार्गावर हा अत्यंत महत्त्वपूर्ण पूल असून, मागील दोन वर्षांपूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली; परंतु दर दिवशी हजारो वाहनधारकांना येथून रात्री अंधारात प्रवास करावा लागतो. या पुलावर आतापर्यंत लहान मोठे डझनभर अपघात घडले असून, एक महिला पोलिस कर्मचाऱ्याला दीड वर्षांपूर्वी आपल्या जीवाला मुकावे लागले. हा पूल दिन ठिकाणी वळण घेते त्यामुळे रात्री येथे समोरून वाहन येत असल्याचे दिसत नाही. येथे या पुलाची उंची ही अधिक आहे. त्यामुळे उलट दिशेने येणारी वाहने येथे एकमेकांना दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

निधी खर्च, पूल अंधारात ५५ कोटींच्या निधी येते खर्च करण्यात आला. पूल प्रकाशमान करण्याकरिता येथे निधीच शिल्लक राहिला नाही. येथे सौर ऊर्जेचे दिवे लावण्याची तरतूद असल्याची माहिती आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला येथे १२ ते १३ पथदिवे लावण्यात येणार होते. त्याकरिता येथे तांत्रिक कामे करण्यात आली आहेत. परंतु निधी नसल्याने हे काम येथे रखडल्याची माहिती पुढे आली आहे. 

मंत्रालयातून हवी मंजुरी पूल बांधकामाकरिता संपूर्ण निधी खर्च करण्यात आला त्यामुळे आता मंत्राल- यातून विशेष बाब म्हणून येथे मंजुरीची गरज आहे. बांधकाम विभागाने वीज विभागाला तसा निधी येथे द्यावा लागणार आहे; निधीचे शिल्लक राहिला नसल्याने येथे पथदिव्यांची कामे शिल्लक आहेत. राज्य मंत्रालयातून मंजुरीकरिता लोकप्र- तिनिधींच्या दालनात हा चेंडू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहि- तेपूर्वी उड्डाण पुलावर पथदिव्याकरिता विशेष बाब म्हणून मंजुरी आणण्याची गरज आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा