शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

जीवनदायी आरोग्य योजनेचा ५ हजार रूग्णांना मिळाला लाभ

By admin | Updated: April 7, 2017 00:31 IST

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा

आज जागतिक आरोग्य दिन : उपचारासाठी १६.१६ कोटी रूपये मंजूरभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा मागील तीन वर्षामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ३९८ रूग्णांनी लाभ घेतला आहे. त्यावर शासनाचा १६ कोटी १६ लाख ६६ हजार ८३० रूपयांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील हृदयरूग्ण, अपघातील रूग्ण, कॅन्सर, किडनीचे आजार, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, जळीत रूग्ण, पोटाच्या शस्त्रक्रिया, फुफ्फूसाचे आजार, प्लॅस्टीक सर्जरी, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया व श्रवणयंत्रे आदी आजाराच्या रूग्णांचा समावेश आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून राज्यात लागू झाली. जिल्ह्याातील पात्र लाभार्थ्यांनी विविध गंभीर व अतिगंभीर आजारावर शस्त्रक्रिया व उपचार करुन घेतले आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी आहे, अशी कुटूंबे किंवा ज्या कुटूंबाकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबे या योजनेचे पात्र लाभार्थी असून ९७१ शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १ डिसेंबरच्या शासन निणर्यानुरुप राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नवीन स्वरुपात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने प्रस्तावित आहे. प्रस्तावित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंमलात आणण्याची प्रक्रीया सद्या चालू असल्यामुळे २१ नोव्हेंबर २०१६ पासून शासनाने पुढील आदेश येईपर्यंत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना चालू राहील व जिल्ह्याामध्ये शासकीय जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व तीन खाजगी अशा ५ रूग्णालयात योजनेतील पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय गटकुळ यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)या योजनेतून मागील तीन वर्षात जिल्ह्यातील नोंदणीकृत रूग्णालयाद्वारे मोफत तपासणी करण्याकरीता ७० आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २० हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली. या योजनेसाठी पात्र रूग्णांना पुढील सेवेकरीता संबंधित रूग्णालयामध्ये संदर्भित करण्यात आले आहे. - डॉ. संजय गटकुळ, जिल्हा समन्वयक, आरोग्य योजना.