शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत ५० लाखांवर कराचा भरणा

By admin | Updated: November 13, 2016 00:20 IST

चलनातील ५०० व १००० रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी मंगळवारी रात्री जाहीर केला.

धसका ५००, १०० रुपयांच्या नोटा बंदचा : नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतींना आले ‘अच्छे दिन’भंडारा : चलनातील ५०० व १००० रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी मंगळवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर नोटा बदलवून घेण्यासाठी लोकांची बँकांमध्ये गर्दी होऊ लागली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कराची रक्कम जुन्या नोटांनी भरण्याची मुभा दिल्यामुळे नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायतींना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यातील सातही नगर परिषद, नगर पंचायततीत नागरिकांनी ५० लाखांवर कराचा भरणा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबदल्यात त्यांनी दोन हजार रूपयांची नवीन नोट चलनात आणली आहे. अनेकांच्या घरात ५०० व १००० रुपयांच्या या नोटा आहेत. चलनातून या नोटा बंद झाल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला. त्यामुळे कमाई बुडेल ही धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली. दरम्यान, नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून बंद होत असलेल्या या नोटांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर भरण्यासाठी वापर करता येईल अशा सूचना नगर विकास विभागाला देण्यात आले. प्रधानमंत्र्यांचा आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी गुरूवार, शुक्रवार व शनिवारला कराचा भरणा केला. दोन दिवसात ५० लाखांवर कराचा भरणा जिल्ह्यासाठी विक्रम ठरला आहे. भंडारा, तुमसर, पवनी, साकोली नगर परिषद तर मोहाडी, लाखांदूर व लाखनी नगर पंचायतीत नागरिकांनी मालमत्ता कर, गृह कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर यासह अन्य करांचा भरणा केला. यापोटी शुक्रवारला नागरिकांकडून ३३ लाख ७० हजार २०३ रुपये भरण्यात आले. शनिवारला या रक्कमेत मोठी वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत हा आकडा उपलब्ध झाला नसला तरी जिल्ह्यात करापोटी जमा होणारा आकडा हा ५० ते ७० लाखांचा घरात जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा येथील नागरिकांनी गृहकर व पाणीपट्टी कराचे पैसे ग्रामपंचायतीत जमा केले असून दोन दिवसात ३० हजार रूपये जमा झाले आहे. (शहर प्रतिनिधी)डाक विभागात ५० लाखांची उलाढालभंडारा प्रधान डाक घरात मागील दोन दिवसात ५० लाखांची उलाढाल झाली आहे. शुक्रवार व शनिवारला नागरिकांनी बंद झालेल्या ५०० व १००० च्या चलनी नोटा बदलवून घेतल्या. यात २६ लाखांचा आर्थिक व्यवहार झाला. अनेकांनी त्यांच्याजवळील रक्कमेतून डाक विभागात गुंतवणूक केलेली आहे. यात नेहमीपेक्षा दुपटी आणि तिपटीने वाढ झाली आहे. दोन दिवसात भंडारा प्रधान डाक विभागाचा आर्थिक व्यवहार ५० ते ६० लाखांवर पोहचला आहे. आणखी या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी डाक विभागाने तीन कक्ष सुरू केले आहे. उद्या रविवारला डाक विभागाची सर्व सेवा सुरू राहणार असल्याची माहिती पोस्ट मास्टर अविनाश अवचट व विपनन अधिकारी बी. डी. सोनकुसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कर भरण्यासाठी नागरिकांची धावपालिका प्रशासन करा भरा, असे आवाहन करीत असते. परंतु कर भरण्यासाठी टाळाटाळ होत असते. मात्र चलनी नोटा बंद होत असल्याचा धसका घेऊन नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कराचा भरणा केला. मागील कित्येक वर्षांचा अनुभव मोडीत काढून नागरिकांनी कराचा भरणा केल्याची बाब भूषणावह ठरली.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, जिल्हा सहकारी आणि अन्य २३ बँकांच्या १५७ शाखा आहेत. या बँकेत आपआपल्या बँकेत जमा होणारी रक्कम स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत जमा होत आहे. मागील दोन दिवसात किती कोटींचा व्यवहार झाला याची माहिती सध्या उपलब्ध नसून आकडेमोड होताच सांगण्यात येईल.- विजय बागडे, मुख्य प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.