शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१२५ नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:59 IST

पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले.

ठळक मुद्देआसगाव येथे घरांत शिरले पाणी । जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. वाही येथे २० घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय पाहुणगाव, इटगाव, कुर्झा, पालोरा व पवनी तालुक्यातील इतर गावांमध्ये अतिवृष्टीने घरांची अंशत: पडझड झाली आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामा सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पवनी तालुक्यात आतापर्यंत अतिवृष्टीने २१२ घरांचे नुकसान झाल्याची माहिती असून कुठलीही जीवीतहानी मात्र झालेली नाही.वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कारधा येथे वैनगंगेची धोक्याची पातळी २४५ मीटर असून आज येथे पाण्याची पातळी २४२.९० मीटर मोजण्यात आली. पाण्याचा विसर्ग ४४५६.९२ क्युसेक्स आहे. वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ४८७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवनी तालुक्यातील खापरी, शेळी आणि काकेपार येथील प्रत्येकी एका घराचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत कोणतीही जिल्ह्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने घरांची पडझडलाखनी : तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. लाखनी मंडळाअंतर्गत ५९.४ मिमी, पिंपळगाव ७३.२ मिमी, पोहरा मंडळात ७७.२ मिमी तर पालांदूर मंडळात ७१.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात २४ तासात बरसलेल्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर दुसरीकडे रोवणीला जोम आला आहे. रोवणीसाठी महिला मजुरांची मजुरीही प्रतिदिवस ५०० रुपयापर्यंत गेली आहे. तालुक्यातील मुरमाडी तुपकर साझाअंतर्गत काही घरांची व गोठ्यांची आंशीक पडझड झाली आहे. कन्हाळगाव येथील अक्षय खोब्रागडे यांचे घर मुरमाडी येथे मिरा देशमुख यांच्याकडील जनावरांचा गोठा, प्रताप कठाणे यांचे घर, हेमराज कठाणे यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा तर रामपुरी येथे मुकुंदा भालेराव व शामराव शिंदे यांच्या घरांची पडझड झाली. या संदर्भातील वृत्ताला तहसीलदार मल्लीक विराणी यांनी दुजोरा दिला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर