शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अन्नातून विषबाधा झालेल्या ४३ विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर; येरली आश्रम शाळेतील प्रकरण

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 25, 2023 19:04 IST

जिल्हा आरोग्य विभागाचा चमू दाखल

भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील खासगी अनुदानित आश्रमशाळेतील ४३ विद्यार्थ्यांना गुरुवारी अन्नातून विषबाधा झाली. यातील सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सद्यस्थितीमध्ये तुमसर उपजिल्हा रुग्णालयात २० विद्यार्थी तसेच जिल्हा रुग्णालयात भंडारा येथे एकूण २३ विद्यार्थी भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोबरवाही येथील येरली येथे शासन अनुदानित आश्रमशाळा आहे. येरली येथील लोकसंख्या ३७४७ आहे. आश्रमशाळेमध्ये मुले २१३ व मुली १९८ असे एकुण ४३१ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २४ ऑगस्ट रोजी मुले १४९ व मुली १५७ असे एकुण ३१६ विद्यार्थी उपस्थित होते.

गुरूवारला एकुण ३१६ विद्यार्थ्यानीं दुपारी १ वाजता जेवण केले. आश्रम शाळेमध्ये त्यांच्या जेवणामध्ये आलू वाटाण्याची भाजी, भात व वरण देण्यात आले होते. तसेच संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी तापासारखे लक्षणे जाणवू लागले. ही बाबीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही यांना संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात गोबरवाही अंतर्गत आरोग्य पथक आश्रम शाळेत दाखल झाले.

आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागले त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यामध्ये एकुण ४९ रुग्णांना असा त्रास असल्याचे जाणवले. विद्यार्थ्यापैकी एक मुलगा व ४२ मुली असे एकुण ४३ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. २३ विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात डिहायड्रेशन असल्यामुळे त्यांना रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालय भंडारा येथे सेवा संदर्भात करण्यात आली. विद्यार्थ्यापैकी १ मुलगा व २२ मुली असे एकूण २३ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे भरती आहेत.

पथकामार्फत तपासणीअन्न विषबाधा बाबतची जिल्हास्तरावरून जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तसेच अन्नाचे नमुने व इतर कारणांचा शोध घेणे सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये साथ उद्रेक आटोक्यात असून साथ उद्रेकाची चौकशी सुरू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा