शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

३,४४७ शेतकऱ्यांना बसला श्वापदांचा फटका

By admin | Updated: March 22, 2015 01:36 IST

भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत.

लोकमत रविवार विशेषदेवानंद नंदेश्वर  भंडाराभंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. श्वापदांच्या पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १४७ मनुष्य जखमी, ३९२ पशुधन ठार तर ३,४४७ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३,९९५ प्रकरणांत २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे.सन २०१४- १५ मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यत श्वापदांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ९६३ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ५३ लाख ७ हजार ४६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. श्वापदांंनी पशुधनावर हल्ला करून ८२ पशुधनाची हानी केली. त्या गोपालकांना ५ लाख १६ हजार ५६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. श्वापदांनी मनुष्यांवर हल्ला करून ४७ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने १० लाख ८३ हजार २३० रूपयांची भरपाई कुटूंबियांना दिलीे. या वर्षात आतापर्यत १,०९२ प्रकरणांसाठी वन विभागाने ६९ लाख ०७ हजार २५० रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे.सन २०१०-११ पासून फेब्रुवारी २०१५ या पाच वर्षाच्या दरम्यान श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ९९५ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ३८ लााख ९२ हजार ९२५ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ६१ लाख ४५ हजार ४० रुपए, पशुधनाच्या नुकसानीसाठी २६ लाख ६० हजार ९० रुपये, जखमी मनुष्यांना २९ लाख ८७ हजार ७९५ रुपए तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. २०१०-११ मध्ये श्वापदांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ जण जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ जण जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले. सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ जण जखमी तर तिघांचा बळी श्वापदांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये श्वापदांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ जण जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.